IMD Weather Forecast And Rain Updates Pune  Esakal
पुणे

Pune Rain Updates: पुण्यासाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Orange And Yellow Alert For Pune: पुण्यातही गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी शहराला याचा फटका बसला.

आशुतोष मसगौंडे

IMD Weather Forecast And Rain Updates Pune: राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पासामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा फटका बसल्याने अनेकांना स्थलांतर करावे लागत आहे.

दुसरीकडे पुण्यातही गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी शहराला याचा फटका बसला.

आता पुणे शहरासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत. कारण हवामान विभागाने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

IMD Weather Forecast Pune

हवामान विभागाने पुणे शहरासाठी 27 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे मैदानी भागात हलका ते मध्यम तिव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे 28, 29 आणि 30 जुलैसाठी पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या तीन दिवसांत शहरासह घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने शहरातील अनेक भागांत पाणी शिरले होते. मात्र, धरण परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सुरु असलेला विसर्ग काल रात्रीपासून बंद करणयात आला आहे.

गेल्या काही दिवसांत खडकवासला धरण परिसरात अतिमुसळधार पाऊस झाल्याने धरण भरले होते. त्यामुळे तीन दिवसाांच्या कालावधीत धरणातून अडीच टीमसी पाणी सोडण्यात आले होते.

सध्याच्या परिस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण 22.62 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी, गेल्या काही दिवसांत धरणातून सोडलेल्या पाण्याचा शहरातील अनेक भागांना फटका बसला आहे. गुरूवारी धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे सिंहगड भागातील एकतानगरीमधील अनेक सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे लोकांना आपली घरे सोडावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

SCROLL FOR NEXT