सिंगापूर, ता.७ (वृत्तसंस्था) ः ‘‘जगातील श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरील कर्ज फेडण्यासाठी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे असून ‘एआय’चे देखील त्यांनी नियमन करावे,’’ असे आवाहन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुखांनी आज केले. श्रीमंत आणि गरीब अशा सर्वच देशांनी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आणि वाढती आर्थिक विषमता रोखण्यासाठी अधिक वेगाने पावले उचलली पाहिजेत कारण त्यांच्या अर्थव्यवस्थांसमोर सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेची झपाट्याने होणारी वाढ, मोठ्या प्रमाणावर घेतलेले कर्ज आणि पश्चिम आशिया तसेच युक्रेनमधील युद्धांमुळे बसणारे धक्के अशी तीन मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, असे प्रतिपादन ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी केले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यामध्ये बँकॉकमध्ये होणार असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘‘जगभरातील आर्थिक धोरणकर्त्यांशी मी पुढील आठवड्यामध्ये संवाद साधणार असून मला या निमित्ताने हेच सांगायचे आहे की आपण आणखी काही काळ याला विलंब लावू शकत नाही. तुमच्याकडे या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे टूल तयार असून त्याच्या वापराचे शहाणपण देखील आहे,’’ असे जॉर्जिव्हा यांनी नमूद केले.
‘एआय’चा बोलबाला वाढणार
बँकॉकमधील बैठकीमध्ये विविध देशांचे अर्थमंत्री, १९१ केंद्रीय बँकांचे गव्हर्नर देखील सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था, वित्तीय स्थैर्य आणि शाश्वत विकासाला कशा पद्धतीने बळ देता येईल, याबाबत सखोल चर्चा होईल. अमेरिका, जपान आणि जर्मनीसारख्या देशांवरील कर्जाचे प्रमाण वाढत चालले असून गरीब देशांनी जनकल्याणाच्या योजनांवर अधिक निधी खर्च करावा, असेही त्यांनी नमूद केले. ‘एआय’मधील गुंतवणूक वाढत जाणार आहे. तुम्ही प्रेम करा किंवा त्याबाबत भीती बाळगा ‘एआय’ला टाळून चालणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
फोटो क्रमांक ः PNE26W55822
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.