Immediate approval for the loan of Rs 224 crore for both the roads in Pune Nagar road 
पुणे

पुणे-नगर रस्त्याला दोन्ही बाजुंनी लेनसाठी २२४ कोटींना अखेर तात्काळ मंजुरी

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर - पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (खांदवेनगर) ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना एकेक लेन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार २२४ कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी मिळाली दिली. तातडीचे काम म्हणून मंजुरी मिळालेल्या या कामाला येत्या दोन महिन्यातच प्रारंभ करण्याच्या सुचनाही यावेळी श्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. 

पुणे-नगर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात केल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होण्यास विलंब होणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी दोन्ही बाजुंना एकेक लेन वाढविण्याची मागणी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागील आठवड्यात केली होती. यावर आज मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या एका बैठकीत या मार्गाचा प्रश्न उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगून या मार्गाला तात्काळ मंजुरी देण्य़ाची सुचना केली. त्यानुसार या खांदवेनर-वाघोली-शिक्रापूर अशा एकुण २६ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा एकेक लेन वाढविण्यासाठी हायब्रीड अ‍ॅन्यूटी योजनेअंतर्गत २२४.२४ कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आले व अवर सचिव प्रशांत पाटील यांच्या सहीचे पत्र आमदार पाचर्णे यांच्या हातातही लगेच देण्यात आले. 

याबाबत बोलताना आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीनंतर या रस्त्याच्या कामाबाबत वेळ लागेल असे दिसू लागताच आपण या प्रकरणी दोन्ही बाजुंनी एकेक लेन वाढविण्यासाठी पाठपूरावा सुरू केला व मुख्यमंत्र्यांनीही त्याला लगेच प्रतिसाद दिल्याने या कामाची निवीदा होवून काम पावसाळा संपला की, पुढील दोनच महिन्यात सुरू होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji New Water Supply Scheme : इचलकरंजी शहरासाठी आता नवी पाणी योजना; राहुल आवाडेंनी सांगितला प्लॅन, मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीच्या सूचना

१५ लाखात तलाठी! लॅपटॉप अन् प्रशिक्षण पत्र देऊन फोटो काढले; बनावट आदेश काढत बेरोजगारांची फसवणूक

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

SCROLL FOR NEXT