पुणे

उंडवडीतील अपघातग्रस्तांना मृत्युंजय दूतांची तत्पर मदत

विजय मोरे

उंडवडी : बारामती-पाटस या महामार्गावरील उंडवडी कडेपठारच्या हद्दीत सोनवडी फाट्यावर भरधाव कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या आपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्ताना मृत्यूंजय दूतांनी वेळेत मदत केल्याने दोघांचे प्राण वाचले. ही घटना आज (ता. 25) रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी पोलिस अधिकारी मेघनाद नवले यांनी दिली. 

याबाबत मिळालेली अशी माहिती होंडा कंपनीची शाईन (एम. एच. ४२ ए.एम. ४६२१ ) ही दुचाकी सोनवडी सुपे फाट्यावरून बारामती रस्त्याकडे वळत असताना हुंडाई कंपनीची चारचाकी (नंबर प्लेट नसलेली )कार बारामतीकडून पाटसकडे निघाली होती. यावेळी या दोन वाहनांचा समोरासमोर जोरदार आपघात झाला. यामध्ये कारच्या एअर बॅग ओपन झाल्याने कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. 

या आपघातात दुचाकीस्वार विशाल गंगाराम गावडे (वय २८ ) व दुचाकीवर पाठीमागे बसलेले अजिंक्य गावडे (वय २७ ) दोघेही (रा. कऱ्हावागज  ता. बारामती) हे गंभीर जखमी झाले आहेत. आपघातानंतर कार चालक पळून गेला. (चालकाचे नाव समजू शकलेले नाही.) यावेळी उंडवडी कप येथील मृत्युंजय दुत समीर शिवाजी जराड यांनी तातडीने जखमीना उपचारासाठीबारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करुन  अपघाताची खबर पोलीसांना दिली. 

बारामती महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस हवलदार वाघमोडे, जाधव, टापसे, शेख, भाग्यवंत यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली व रस्त्यावर पडलेली आपघात वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी पोलिस अधिकारी मेघनाद नवले म्हणाले, आपघातांचे वाढते प्रमाण हे काळजाचे ठोके वाढविणारे आहे. या अपघातातील रुग्णांना वेळीच आणि योग्य तो उपचार मिळावा. व मृतांच्या संख्येत घट व्हावी, या उद्देशाने अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय (वाहतूक )महाराष्ट्र राज्य, मुंबई हे १ मार्च २०२१ पासून हायवे मृत्युंजय दूत योजना ही संपूर्ण महाराष्ट्रभर राबवीत आहेत. ही योजना महाराष्ट्रभर राबविण्यासाठी जागोजागी मृत्युंजय दूत यांची नेमणूक केलेली आहे. ही संकल्पना महामार्ग पोलीस पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संजय जाधव व पोलीस उपाध्यक्ष प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक राजन सस्ते यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलीस राबवित आहेत." 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले तब्बल 14.10 कोटी रुपये! ‘या’ मल्टिबॅगर शेअरने 6 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

घसरलेल्या टीआरपीने स्टार प्रवाह हादरलं ! 'ठरलं तर मग'सकट तीन मालिकांची वेळच बदलली

Nature Painting Movement : दर शनिवारी रंगतो निसर्गाचा सोहळा; ३५ हून अधिक चित्रकारांची जलसंवर्धनासाठी अनोखी मोहीम

Nashik Farmer : कर्जमाफीसाठी शेवटचे २ दिवस! ८ हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे न दिल्यास लाभापासून मुकणार

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

SCROLL FOR NEXT