strike esakal
पुणे

Teachers Agitation : शिक्षकांच्या आंदोलनामुळे मनपा शाळेवर परिणाम

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजच्या आंदोलनात पुणे महापालिकेच्या शाळांमधील सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजच्या आंदोलनात पुणे महापालिकेच्या शाळांमधील सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले होते.

पुणे - जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजच्या आंदोलनात पुणे महापालिकेच्या शाळांमधील सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक आंदोलनाला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनाही शाळेत येऊ नका असा निरोप देण्यात आल्याने अनेक शाळांना सुट्टी असल्या सारखीच स्थिती होती.

राज्यभरात जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पुण्यात आज सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या शाळांमधील अडीच हजार पैकी १ हजार शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नव्हते. त्यामुळे रजा मुदतीमधून काम करणाऱ्या शिक्षकांनी वर्ग सांभाळले. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक आंदोलनाला जाणार असल्याने शाळेत येऊ नका अशा सूचना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची संख्या शाळेत कमी होती.

‘जुन्या पेन्शन योजनेच्या आंदोलनात महापालिकेचे २५० शिक्षक पूर्णवेळ सहभागी झाले आहेत. आजच्या आंदोलनात सुमारे १ हजार शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांवर परिणाम झाला नाही. पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती.

- सचिन डिंबळे, राज्याध्यक्ष, महापालिका, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT