वाढत्या उष्णतेचा शेतीकामांना फटका
खानदेशातील स्थिती
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात उष्णता सतत वाढत चालली आहे. यामुळे पिके होरपळत आहेत. याचा शेतीकांनाही फटका बसत असून, शेतकऱ्यांचा सकाळी लवकर कामे उरकून घेण्यावर भर आहे.
खरीप हंगाम तोंडावर आहे. यातच उन्हाळी पिके शेतात आहेत. त्यांच्या कापणी, काढणीचे काम सुरू आहे. उशिरा लागवडीचा कांदा, बाजरीचे पीक शेतात पक्व झाले आहे. काही भागात मजूरटंचाई आहे. तर काही भागात अधिकची मजुरी देवून मजूर आणावे लागत आहेत. अशात मजूरमंडळी सकाळी लवकर कामे करीत आहे. त्यात सकाळी सात ते दुपारी १२ या कालावधीत कामांची नवी वेळ अनेक भागांत तयार झाली आहे. मजुरी दर मात्र स्थिर आहेत. त्यात पुरूषास २५० रुपये व महिलेस २०० रुपये रोज दिला जात आहे. काही भागात महिलांना १८० रुपये रोज आहे.
चौकट
सूर्य कोपला
मजूरटंचाई असतानाच सूर्यही कोपला आहे. सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके बसतात. सकाळी अकरा पासून प्रचंड ऊन तापते. खानदेशात सध्या रोज ४४ ते ४५ अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे. मध्यंतरी काही भागात ४७ अंश सेल्सीअसपर्यंत कमाल तापमान पोचले होते. सायंकाळी सात ते १० पर्यंत उष्ण झळा बसतात.
चौकट
रात्रीही कामांचा धडाका
खरीप हंगाम जवळ आल्याने शेतीकामे उरकताना मोठ्या व अन्य शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. अनेक जण शेणखताची वाहतूक, मशागत, कुट्टीची वाहतूक आदी कामे रात्री करून घेत आहेत. त्यासाठी पहाटेपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करावे लागत आहे. यात अनेक मजूर सायंकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत ही कामे करीत आहेत. तर काही जण रात्री नऊ ते पहाटेपर्यंत ही कामे करीत असल्याचे चित्र खानदेशात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.