पुणे

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण

CD

पुणे, ता. १२ : भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरण असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार (ता. १६) पासून सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. यात एक्झिम धोरण, इन्कोटर्मस, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटीच्या कौशल्यापासून कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत प्रशिक्षणात माहिती मिळेल. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.

मुलांसाठी जर्मन भाषा समर कॅम्प
मुलांना परदेशी भाषेची ओळख करून देण्यासाठी सहा दिवसांचा विशेष ऑनलाइन समर कॅम्प शनिवार (ता. १६) पासून आयोजिला आहे. आजच्या जागतिक युगात परदेशी भाषांचे महत्त्व वाढत असून, लहान वयात नवीन भाषा शिकल्याने मुलांची संवादकौशल्ये, आत्मविश्वास आणि जागतिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. याच उद्देशाने या समर कॅम्पमध्ये बेसिक जर्मन शब्द, संवाद कौशल्य, जर्मन ग्रीटिंग्जची ओळख करून दिली जाणार आहे. याशिवाय योग्य उच्चार व बोलण्याचा सराव, विविध खेळ, क्वीझ आणि परस्परसंवादी शिक्षण उपक्रमांद्वारे मुलांना आनंददायी वातावरणात भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन लाइव्ह सत्रांमुळे विद्यार्थी घरबसल्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील. हा कॅम्प मुलांमध्ये नवीन भाषा शिकण्याची आवड निर्माण करून त्यांना ग्लोबल लँग्वेज लर्निंगकडे जाण्यास प्रोत्साहित करणारा आहे.

व्यावसायिक लोणचे कार्यशाळा
महाराष्ट्रीय जेवणामध्ये लोणच्याला विशेष महत्त्व आहे व विविध प्रकारच्या लोणच्यांना मोठी बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक पद्धतीने लोणचे कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २३ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये आंबा, लिंबू, मिक्स, मिरची, आवळा, तिखट लिंबू, हळद, चिंच, लसूण, गावरान, राजस्थानी, लिंबू चुन्दा, आंबा चुन्दा, ड्रायफ्रूट, खजूर, टोमॅटो, हैदराबादी, कारले, अंबाडी इत्यादी प्रकारचे लोणचे प्रात्यक्षिकासह शिकविणार आहे. यासह कार्यशाळेत लोणच्याच्या व्यावसायिक पद्धती, लोणचे साठविण्याची व टिकविण्याची प्रक्रिया, ब्रॅण्डिंग, कॉस्टिंग, पॅकिंग व बाजारपेठेविषयी मार्गदर्शन होईल.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT