पुणे

स्तनपान सप्ताहानिमित्त बारामतीत जनजागृती

CD

बारामती, ता. ७ : माता व नवजात शिशूच्या सुदृढ आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय व शासकीय महिला रुग्णालयाच्या सहकार्याने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन दगडे, पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. लीना नखाते, बालरोग विभागप्रमुख डॉ. समीर पवार, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, मॅट्रन सीमा माने तसेच बालरोग विभागाच्या प्रमुख परिचारिका रजिता यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गर्भवती व प्रसूत माता तसेच त्यांच्या कुटुंबीयांना स्तनपानाचे आरोग्यदायी फायदे, योग्य स्तनपानाची पद्धत आणि आईच्या दुधामुळे नवजात बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होणारी मदत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व आणि जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देण्याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी स्तनपानामुळे बालकाच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते, तसेच सहा महिन्यांनंतर पूरक आहारासह दोन वर्षे किंवा त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत मातांना वैज्ञानिक माहितीच्या आधारे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

SCROLL FOR NEXT