Alchoholic 
पुणे

पुण्यातील मद्यप्रेमींसाठी महत्त्वाचे! सोमवारपासून दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिअर बार आणि वाइन शॉपच्या दुकानांमधून घरपोच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ही घरपोच (होम डिलिव्हरी) पार्सल सुविधा सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे. मागील लॉकडाउनच्या कालावधीत बिअर बार बंद ठेवण्यात आले होते. तसेच, वाइन शॉपमधून विक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या दोन एप्रिलपासून बिअर बार आणि वाइन शॉपमधून मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर परिणाम झाला आहे. 

हेही वाचा - पुणेकरांनो नीट वाचा; असा असणार आहे ‘विकेंड लॉकडाउन’
दरम्यान, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार मद्य विक्रीसाठी होम डिलिव्हरीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या शनिवार आणि रविवारी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 
हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
मोबाईल क्रमांकावरून होम डिलिव्हरी 
मागील लॉकडाउनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन शॉपमधून एमआरपी दराने ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी दिली होती. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या वेळी संबंधित बार किंवा वाइन शॉपबाहेर दिलेल्या किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून मद्य मागवावे लागणार आहे. होम डिलिव्हरीसाठी वेगळे चार्जेस लागतील की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT