पुणे

आजी, आजोबांसह मुलांसाठी महत्त्वाचे...

नीला शर्मा

जगभरात थैमान घालणारा कोरोना पुण्यातही बस्तान बांधू लागलाय. त्याला वेळीच रोखणे हे आपल्याच हाती आहे. या विषाणूपासून लहान मुले आणि ज्येष्ठांची खास काळजी घ्यायला हवी. यासाठी त्यांच्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.   

सध्या शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घराबाहेर न पडणे हेच हिताचे आहे. अर्थात, घरात बसून राहावे लागत असल्याने ज्येष्ठांबरोबरच लहानग्यांनाही अवघडल्यासारखे ठरते. अशा वेळी योग्य आहार जेवढा महत्त्वाचा आहे, तितकेच महत्त्वाचे आहे ते घरबसल्या खेळता येणारे खेळ व व्यायामावर लक्ष केंद्रित करणे, त्यामुळे विरंगुळा तर होईल; पण आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होईल. 

यातून वाढवा रोगप्रतिकारशक्ती
    संत्रा, मोसंबी व लिंबाचा रस
    ज्येष्ठमध, आले, हळदीचे उकळलेले मिश्रण
    दालचिनी, आले, किसलेल्या लिंबाच्या सालीचा काढा 
    कुळीथ व लसूणपाकळी घालून केलेले सूप 
    केशरी रंगाच्या भाज्या, काकडी,  बीट, गाजर, कच्चा कोबी खावा

घरात, गच्चीवर खेळा खेळ
    जलद चालणे किंवा पळणे
    सापशिडी, बुद्धिबळ इत्यादी
    डंबेल्सऐवजी बाटल्यांत पाणी भरून व्यायाम करा
    याशिवाय अन्य पेलवणारे व्यायाम
    एकत्रित सूर्यनमस्कार करा

कोरोनाला यजमान पेशी मिळाली तरच प्रादुर्भाव होतो, त्यामुळे रोगप्रतिकार सशक्त ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, विश्रांती, मानसिक स्वास्थ्य आदींचा उपयोग होतो. 
- डॉ. विभूषा जांभेकर, आहारतज्ज्ञ

वयोवृद्धांना जिम किंवा बागेत जायची सोय सध्या नसली तरी त्यांना घरात छोटे, पेलवणारे व्यायाम शक्‍य आहे. शारीरिक शिक्षणातील व्यायाम आठवून ते करा. 
- डॉ. अजित मापारी, क्रीडावैद्यकतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

SCROLL FOR NEXT