पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउनबाबत होणार 'हा' महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तब्बल दहा दिवसांच्या लॉकडाउननंतर उद्यापासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात व्यवहार नियमित सुरू होणार का, या बाबत उत्सुकता लागली आहे. 'अनलॉक' बाबत काय होणार, कोणते व्यवहार सुरू राहणार, काय बंद राहणार या बाबतचे चित्र आज सायंकाळी पाच वाजता स्पष्ट होणार आहे. विभागीय आयुक्त पत्रकार परिषद घेऊन 'अनलॉक' बाबत माहिती जाहीर करणार आहेत.

13 जुलैपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याची मुदत आज गुरुवारी मध्यरात्री संपत आहे. त्यामुळे उद्यापासून नेमके काय चित्र राहणार, कोणत्या गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार, कंटेनमेंट झोनमध्ये काय चित्र राहील, दुकाने सुरू राहणार की बंद राहणार, सम की विषम तारखांना परवानगी मिळणार, सलून, मॉल, मंगल कार्यालय यांना परवानगी मिळणार काय, याबाबत उत्सुकता आहे. 

यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत लॉकडाउन बाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

लॉकडाउनच्या गेल्या दहा दिवसांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. एकट्या पुणे शहरात 42 हजार 466 रुग्ण संख्या झाली असून, त्यातील 16 हजार 269 रुग्ण उपचार घेत आहेत.  एकूण रुग्णांपैकी 25 हजार 129 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, दररोज पंधराशेपेक्षा जास्त रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउनमध्ये कशाप्रकारे शिथिलता दिली जाणार या बाबतही उत्सुकता आहे. व्यापारी, व्यवसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मात्र, कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन उठलेच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता प्रशासनाकडे लागल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउन उठवताना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे, त्या भागात पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Update : तयारीला लागा! जिल्हा परिषद निवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा, राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत

Pune Air Pollution : पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावतेय; महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी

Karnataka : राज्यातील पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

'बसमध्ये पत्नीचा पतीवर चाकू हल्ला'; बार्शी शहरातील धक्कादायक घटना; आई, भावास बेदम मारहाण, नेमकं काय कारण?

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT