पुणे

काऱ्हाटीच्या श्रीयशवंतरायाच्या उत्सवाबाबत महत्वाची बातमी

जयराम सुपेकर

सुपे : काऱ्हाटी (ता.बारामती) येथील ग्रामदैवत श्री यशवंतरायाच्या उत्सवात यंदा पुरण-पोळीचा नैवेद्य आहे. मंगळवारपासून (ता. १५) तीन दिवस येथील यात्रा भरणार होती. कोविड-१९ या कोरोना महामारीच्या साथीमुळे ग्रामस्थांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यात्रा समितीच्या सुत्रांनी दिली.

मार्गशिर्ष प्रतिपदा ते तृतिया असे तीन दिवस येथील उत्सव असतो. जिल्ह्याच्या बाहेरूनही जत्रेसाठी भाविक व विविध दुकाने येथे थाटली जातात. चुलीवरची बाजरीची भाकरी व मटणासाठी येथील उत्सव प्रसिद्ध आहे. परिणामी बाहेरगावाहून येणारे पै-पाहूणे व भाविकांची मोठी गर्दी होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी यंदा पशुहत्या न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. गावच्या परिसरात आज आखेर कोरोनाचे ३१ रुग्ण असून पैकी दहा रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच झाली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी काऱ्हाटी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची जत्रा रद्द करण्यात आली आहे.

उत्सव कालावधीमध्ये गावात सार्वजनिक व वैयक्तिक पशु हत्तेवर तसेच, गावात मटन, चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सदर बाबींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

उत्सव काळात बाहेरून येणारे भाविक, दुकानदार, छोटेमोठे व्यवसायिक व पाहुण्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कोरोना विषयक सरकारी सर्व नियमांचे पालन करून केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कुस्त्यांचा फड यंदा भरणार नाही. लोकनाट्य होणार नाही. त्यामुळे बाहेर गावाहून येणारे भाविक, पाहूणे मंडळी व विविध व्यावसायिकांनी गावात येऊ नये असे अवाहन करणारे फलक गावच्या प्रमुख चौकात लावण्यात आले आहेत.   

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT