Dhananjay Munde Sakal
पुणे

Dhananjay Munde : कृषी मंत्री मुंडे यांची अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टबाबत महत्वपुर्ण भूमिका

अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट उत्तम काम करीत आहे

कल्याण पाचंगणे

माळेगाव : ``राज्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती व्हावी, यासाठी बारामतीचे अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट महत्वपुर्ण काम करीत आहे. त्यामध्ये येथील कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेले` कृषिक अ‍ॅप राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे. अर्थात कृषी क्षेत्रातील अशा अनेक नाविन्यपुर्ण गोष्टी समजून घेण्यासाठी खरेतर आम्ही बारामतीला आलो आहे, ``अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

संबंधित मंत्रीमहोदयांनी शारदानगर  येथील अटल इनक्युबेशन सेंटर, सायन्स सेंटर, कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट उत्तम काम करीत असल्याचे संबंधित मंत्रीमहोदयांनी बोलून दाखविले. 

यावेळी संस्थेचे विश्वस्त रणजित पवार, सीईओ निलेश नलावडे, विवेक भोईटे आदींनी अटल इनक्युबेशन सेंटरसह विविध विभागाची माहिती संबंधितांना दिली. अटल इनक्युबेशन सेंटर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता, वेअरेबल काॅम्प्युटिंग आणि आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी आधारित स्मार्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर संशोधन चालू असल्याचे श्री. नलवडे यांनी सांगितले. कृषी आणि अन्न उद्योगातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अटल इनक्युबेशन सेंटर महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही नलवडे यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बारामती सहकारी बॅकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,  माळेगावचे संचालक योगेश जगताप, माजी सभापती करण खलाटे, बारामती दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, प्रांताधिकारी वैभव नावडेकर, संचालक अनिल तावरे आदी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेती आणि शेती पुरक व्यवसाय, कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण शिक्षण प्रणाली व पर्य़ावरणपूरक शेती या संदर्भातील त्रिसूत्रीचा अवलंब यापुढे केला जाईल. यापुढील काळात पर्य़ावरणाचा समतोल साधून शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानचा अवलंब करावा लागणार आहे, अशा अनेक पर्य़ायांचा वापर करावा लागणार आहे,  त्या दृष्टीने राज्याचा कृषी विभाग काम करेल, असे मत उपस्थितांशी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT