पुणे

पुण्यातील खानावळींबाबत महत्वाची अपडेट

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः डेल्टा प्लस व्हेरियंटच्या धोक्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पुन्हा काटेकोर होऊ लागले आहेत. त्याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. त्यातच सुरू झालेल्या खानावळी पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. स्पर्धा परीक्षांचे परतलेले विद्यार्थी संभाव्य लॉकडाउनच्या भीतीमुळे गावाकडे परतू लागले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी लगतच्या जिल्ह्यांतून आलेले आहेत. यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अभ्यासासाठी येतात. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये अनेक खानावळी आहेत. सध्या ५० टक्के क्षमतेने सरकारने अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर खानावळी सुरू ठेवण्यासाठी परवानगी होती. परंतु, डेल्टा प्लसच्या व्हेरीयंटमुळे विद्यार्थी गावाकडे परतू लागले आहेत. त्याचा थेट फटका खानावळींवर झाला आहे. खानावळीचे भाडे, विविध खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आदी अनेक समस्यांना खानावळ चालकांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, काही चालकांनी खानावळी बंद केल्या आहेत.

खानावळचालक योगेश घुबे म्हणाले, ‘‘शहरात काही विद्यार्थी आले आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुरेसे पैसेही आम्हाला मिळत नाहीत. त्यात येथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मासिक वेतन द्यावे लागते. यामुळे चालकांचे पूर्ण अर्थकारण बिघडले आहे. शिवाय परीक्षाच न झाल्याने विद्यार्थी पुन्हा गावी गेले आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.’’

असे कोलमडले गणित- कोरोनापूर्वी सदाशिव पेठेतील एका खानावळीत दरमहा सुमारे ३०० मुले येत होते. त्यातून सुमारे साडेसात लाखांची उलाढाल होत असे. मात्र, हीच उलाढाल आता ६० हजार ते तीन लाखांजवळ आली आहे. काही खानावळ चालकांनी बाहेरून येऊन येथे आपला व्यवसाय स्थापित केला. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवसाय उध्वस्त झाला आहे. त्यामुळे काही खानावळचालकांना गावी परतावे लागले, असे सुधीर नेवसे यांनी सांगितले.

भयाण परिस्थिती- वंदना व नीरज जैन हे दांपत्य मूळचे जळगावचे असून पुण्यात २०१८ पासून त्यांनी खानावळ सुरू केली. सुमारे २०० विद्यार्थी त्यांच्याकडे होते. अनेक ठिकाणी रविवारी खानावळ बंद असते. मात्र, हे दांपत्य रविवारीही एका वेळेस विद्यार्थ्यांना टोकण पद्धतीने डबे देत. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन सुरु झाले आणि खानावळी बंद पडत गेल्या. खानावळीचे दरमहा ६० हजार रुपये भाडे आणायचे कोठून, हा प्रश्न जैन दाम्पत्यापुढे होता. आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली. परिणामी, खानावळ बंद करून त्यांना पुन्हा जळगाव गाठावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT