पुणे

रुग्णसेवेचा दर्जा सुधारावा वायसीएमच्या बैठकीत सूचना 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) रूग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्याबाबत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावावा, अशा सूचना गुरुवारी (ता. 30) रुग्णालयात आयोजित बैठकीत करण्यात आल्या. 

बैठकीला आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसेविका सुजाता पालांडे आदी उपस्थित होते. 

रुग्णालयामध्ये रुग्णांना आवश्‍यक सेवासुविधा देणे आवश्‍यक आहे. रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न व्हावेत. डॉक्‍टरांची संख्या वाढवावी. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी. नादुरुस्त यंत्रसामग्री दुरुस्त करून उपयोगात आणावी, अशा सूचना उपस्थितांनी केल्या. 

बैठकीतील प्रमुख सूचना : 
* स्वाइन फ्लूचे वाढत्या रुग्णामुळे आरोग्यविषयक दक्षता घ्यावी 
* महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये टॅमिफ्ल्यू व इतर औषधांचा पुरेसा साठा करावा 
* रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेचे कामकाज लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT