Baramati Crime News  Sakal
पुणे

Baramati Crime News : बारामतीत प्रेमी युगुलास निर्वस्त्र करीत लुटले

पोलिसांची निष्क्रीयता ठळकपणे समोर आली असून एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

मिलिंद संगई, बारामती

बारामती- प्रेमी युगुलास अडवून त्यांना मारहाण करत मुलीच्या अंगावरील 90 हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. या युगुलाचे कपडे उतरवित आक्षेपार्ह अवस्थेत त्यांचे फोटो चोरट्यांनी काढून नेल्याची धक्कादायक घटना बारामती विमानतळानजिक घडली. अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून त्या पैकी एकाने पोलिसात फिर्यादच नोंदविलेली नसल्याचेही पुढे आले आहे.

वाढत्या चो-यांमुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना आता प्रेमी युगुलाचे कपडे उतरवून त्याचे फोटो काढण्यापर्यंत चोरटयांची मजल गेल्याने बारामतीकर कमालीचे असुरक्षित बनल्याची नागरिकांची भावना आहे. पोलिसांची निष्क्रीयता ठळकपणे समोर आली असून एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

शुक्रवारी (ता. 10) एक युवती आपल्या मित्रासह मोटारीतून विमानतळानजिक फिरायला गेली असताना दोन अज्ञात चोरटे मास्क लावून आले, त्यांनी चाकूचा धाक दाखवित युवतीच्या गळ्यातील चेन व कर्णफुले काढून घेतले. युवकाला त्यांनी दगडाने मारहाणही केली. त्या नंतर त्यांना जबरदस्तीने निर्वस्त्र करुन त्यांचे फोटो काढले.

संबंधित युवतीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका व्यक्तीसोबत घडल्याचेही समोर आले असून पोलिसांनी त्यांनाही बोलावून घेत चौकशी सुरु केली आहे. बारामतीत पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही अशीच स्थिती गेल्या काही महिन्यात घडली असून वरिष्ठ अधिकारी या बाबत मौन बाळगून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT