pune sakal
पुणे

केशवनगर कुंभारवाड्यात देवीच्या मुर्तींना रंग देण्याची लगबग

घटस्थापनेचा मुहूर्त जवळ आला असल्याने नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे

कैलास गावडे

मुंढवा : केशवनगर येथील कुंभरवाड्यात मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत साच्यातून तयार मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यावर तणस आणि मातीचा लेप चढवून मूर्तीला प्राथमिक रुप देण्यात कलावंत गुंतले आहेत. तर काही ठिकाणी मूर्तीसाठी मिश्रण तयार करण्यापासून ओतीव काम, साच्यातील मूर्तीला पॉलिश करण्याचे काम संपवून रंगरंगोटीच्या कामास सुरूवात झाली आहे.

शहरातील विविध भागात गुरूवार दि. ७ आक्टोबर रोजी घटस्थापना होणार असल्याने नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचे पर्व म्हणून नवरात्रौत्सव सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्दीदात्री अशा देवीच्या नऊ मुळ रूपांची आराधना नऊ दिवस केली जाते. मात्र कोरोनामुळे अनेक बंधने यावर्षी देखील नवरात्र उत्सवासाठी आहेत. मूर्तीची उंची त्याचप्रमाणे उत्सव साजरा करण्यावर बंधने असल्याने मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनी देखील कमी उंचीच्या मुर्त्या घडवल्या आहेत. केवळ एक ते चार फुटांच्या मुर्त्या यावर्षी बनविण्यात आल्या आहेत.

नवरात्रोत्सवासाठी दुर्गेच्या विविध रूपी मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माँ शेरावाली, सिंहावर बसलेली आंबामाता, कलकत्याची कालिका, वणीची सप्तश्रृंगी माता, महिषासुरमर्दिनी, संतोषी माता, पंच सिहांच्या रथावर आरूढ झालेली देवी महालक्ष्मी, दुर्गादेवी, वाघावरील दुर्गादेवी, सप्तशृंगीदेवी, रेणुकादेवी, तुळजा भवानी अशा विविध प्रकारच्या देवी मूर्ती साकारल्या आहेत. त्या मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना त्यांच्या डोळ्यांतील तेजस्विता आणि रंगोटीतील आकर्षकता वाढविण्याचे काम जोमाने सुरू आहे. अशा दुर्गेच्या रूपानी कुंभारवाडा भरून गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून देवीच्या सिंहवाहिनी रूपासह मूर्तीतही नावीन्य आले आहे. तसेच बंगाली दुर्गामाता, कालिमाता, महिषासुरमर्दिनीसह अंबाबाईचे रुपही नवरात्रोत्सवात मूर्तीरूपात पूजनासाठी साकारण्यात आले असल्याची माहिती प्रज्ञा आर्टचे सुभाष वाकीकर यांनी सांगितले.

यावर्षी सर्वात जास्त मागणी ही आंबाबाई आणि सप्तश्रृंगी मातेच्या चार फुटांच्या मूर्त्यांना आहे. केशवनगर परिसरातील कुंभार वाडयात दुर्गामातेच्या एक ते चार फूट उंचीच्या मूर्ती तयार आहेत. सध्या कुंभार वाडयामध्ये मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. परंतु कच्चा माल महाग झाल्याने मूर्त्यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.

येथील सागर आर्ट, ओम चैतन्य आर्ट, श्री आर्ट, प्रज्ञा आर्ट, विजयआर्ट तसेच अन्य घरांमध्येही लहान देवीच्या मुर्ती बनविल्या आहेत. कुंभारवाड्यात सुमारे दोन हजार मुर्त्या बनविल्या तयार केल्या आहेत. त्यांना जिल्हा व राज्याबाहेरून खूप मागणी आहे. येथून सातारा सांगली तसेच गुजराथ व राजस्थानमध्ये मुर्ती पाठविल्या जातात. अशी माहिती सुभाष वाकीकर, विजय शिंदे, दत्तात्रय कुंभार यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूककोंडीचा कहर! सलग तिसऱ्या दिवशी १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Virat Kohli Viral Video: दिवाळीची तयारी मैदानावरच? विराटने केएल राहुलचा केला 'परफेक्ट लुक', तर भर मैदानात केली ईशान किशनची नक्कल

VFX आणि ४००० कोटींचा नरेटिव्ह योग्य वाटत नाही... 'रामायण' बद्दल सलमान खानची प्रतिक्रिया चर्चेत, ऐकून सगळे चकीत

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमध्ये दाखल

Solapur BJP Congress Clash : प्रणिती शिंदेंवरील वक्तव्यावरून पेटला वाद; मरिआई चौकात मध्यरात्री भाजप आमदार अन् काँग्रेस शहराध्यक्ष भिडले, पोलिसांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT