Pune Attack On Engineers Car In Sus Gaon Esakal
पुणे

Viral Video: पुण्यात रात्री थरार... कारमधून निघालेल्या इंजीनिअरच्या कुटुंबावर 40 जणांकडून रॉड, दगड अन् काठ्यांनी हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Attack On IT Engineers Car In Pune: या व्यक्तीने त्यांच्या कारवर काठी, रॉड आणि दगडांनी सुमारे 40 लोकांनी हल्ला केल्याची आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसगाव येथे राहणाऱ्या एका इंजीनिअरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे.

रवी कर्णानी नावाच्या या व्यक्तीने त्यांच्या कारवर काठी, रॉड आणि दगडांनी सुमारे 40 लोकांनी हल्ला केल्याची आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

दरम्यान या प्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा सर्व प्रकार 29 सप्टेंबर रोजी लवळे गाव ते नांदे या रस्त्यावर घडले आहे.

इंजीनिअरच्या पोस्टमध्ये काय?

रवी कर्णानी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमच्यावर हल्ला झाला. रस्त्यावरील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 40 लोक लोखंडी रॉड, दगड आणि काठ्या घेऊन आमच्या गाडीवर हल्ला करत होते. 2 बाइक आणि गुंड असलेले स्थानिक एक कार 80kmpl वेगाने आमचा पाठलाग करत होते. असे अशताना स्थानिक पोलिसांनी ते गस्त घालत होते असे सांगत त्यांची बाजू घेतली."

कर्णानी यांनी पुढे म्हटले आहे की, "मला मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारे स्थानिक गुंड होते. जे बहुतेक MH12 किंवा MH14 क्रमांक नसलेल्या कार चालकांचा छळ करतात. या लोकांमुळे माझ्या कुटुंबाला मोठा धोका निर्माण झाला होता.

दरम्यान फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रवी नारायण कार्णानी हे आयटी इंजीनीयर असून, ते सुरगांव येथे राहतात. 29 सप्टेंबर रोजी लवळे गाव ते नांदे असा प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांची ह्युंदाई कार जबरदस्ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने गाडी थांबवली नाही म्हणून केटीएम बाइकवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या कारवर हल्ला केला. पुढे याच रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांनीही फिर्यादीच्या कारवर हल्ला केला.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात अदाखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले असून, पौड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT