Crime  sakal media
पुणे

पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याची महिलांना अरेरावी

आमच्याकडचे वीज बील मागून घेतले आणि वीज पुरवठा खंडित करून मिटर काढून घेऊन गेले.

समाधान काटे

शिवाजीनगर : वीज बील थकले असल्याने वीज प्रवाह खंडित करण्यासाठी शिवाजी हौसिंग सोसायटी येथील महावितरण कर्मचारी जनवाडी- जनता वसाहत येथे येऊन, घरोघरी वीज बिलाची मागणी करतो.बील थकीत असेल तर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कामाला लागतो.परंतू हे सर्व करत असताना महिलांना पातळी सोडून बोलतो.घरी पुरुष नसल्याने वीज खंडित करू नका अशी महिला विनवणी करतात. पुरुष मंडळी फोनवर सांगतात,"आम्ही वीज बिल भरतो", तरी देखील महिलांना पातळी सोडून बोलण्याचे धाडस महावितरण कर्मचारी करत आहे. जनता वसाहत मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात कळवले असल्याने नागरिकांनी सांगितले.सकाळी अकरा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी घरी आले.

आमच्याकडचे वीज बील मागून घेतले आणि वीज पुरवठा खंडित करून मिटर काढून घेऊन गेले. मुलं घरामध्ये अभ्यास करत असतात.वीजपुरवठा बंद केल्याने मोबाईल देखील चार्जिंग करता येत नाही.तीन महिने झाले माझ्या हाताला काम नाही,घरात बसून असतो, वीज बील भरण्यासाठी सवलत देयला हवी होती.

- शेट्टेवार धोत्रे,जनता वसाहत.

घरात आजारी पेशंट आहे, मुलांना कामं नाहीत, व्याजाने पैसे काढून मागील थकलेले थोडे वीज बील भरले,घरात मुलं नसताना मिटर कट केलं.शुक्रवार पर्यांत थांबले नाहीत.मिटर चेक करायला येत नाहीत.जादा वीज बील येते, विनवणी करुन देखील वीज मिटर कट केले.घरात मुलांचा अभ्यास असतो.

- महादेव बुरूड, रहिवासी जनवाडी जनता वसाहत.

वीज मिटर कट करण्याच्या अगोदर नागरिकांना मोबाईल वर नोटीस पाठवली जाते.जो शेलार म्हणून कर्मचारी आहे त्याबदल् नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.ग्राहकांना नीट बोलावं अशी समज त्यांना दिली आहे. आपण कामगार आहोत त्याप्रमाणे आपण राहायचं असं सांगितलं आहे.

-अमित शिंदे सहायक अभियंता महावितरण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT