Pune Assault Case Esakal
पुणे

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Sexual Assault Case Warje Pune: यानंतर घाबरलेल्या पीडीतेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि थेट वारजे पोलीस स्टेशन गाठले.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. आज सलग चौथ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वारजे माळवाडी या भागात 50 वर्षीय नराधमाने 36 वर्षांच्या महिलेवर घरात घुसून अत्याचार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरातील एका सोसायटीतील 36 वर्षीय महिला आपल्या घरात भांडी घासत होती. तेव्हा आरोपीने घरात घुसून आई कुठे आहे आई कुठे आहे असा आवाज देत पीडित महिलेला खाली पाडत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर घाबरलेल्या पीडीतेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि थेट वारजे पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरुन वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन दिवसांपूर्वी बापाचे काळा कृत्य

दरम्यान वारजे माळवाडीतच दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत वडिलांविरुद्ध आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात गेल्या चा दिवसांत महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. आधी शाळेच्या बस चालकाने एक मुलीवर बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी तीन ते चार जणांच्या टोळीने मित्राबरोबर फिरायला गेलेल्या मुलीला शिकार केले. आणि आता ही घटना समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT