पुणे

आयएनएस शिवाजीतर्फे ‘बोट पुलिंग रेगाटा’ उत्साहात

आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर अरविंद रावल यांच्या हस्ते ‘द कॉक’ हे पारितोषिक प्रदान केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आयएनएस शिवाजी लोणावळा येथील भारतीय नौदलाची सागरी अभियांत्रिकी संस्थेच्या वतीने ‘बोट पुलिंग रेगाटा’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. नौदल सप्ताहांतर्गत आयोजित या स्पर्धेत नौदलाच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी, जवान, सेवेत असलेले अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता. भारतीय नौदलात नौदल क्रीडामधील एक सर्वांत प्रतिष्ठेची आणि राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा आयएनएस शिवाजी येथील शिवसागर धरण येथे झाली. स्पर्धेमध्ये नौकानयन आणि त्यांचे विविध प्रकार घेण्यात आले. स्पर्धेत अधिकारी संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून, आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर अरविंद रावल यांच्या हस्ते ‘द कॉक’ हे पारितोषिक प्रदान केले.

हाफ मॅरेथॉन स्पर्धेस प्रतिसाद

शनिवारी आयएनएस शिवाजी येथे १० आणि ५ किलोमीटरचा हाफ मॅरेथॉनची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये तिन्ही दलांचे अधिकारी, जवान, त्यांचे कुटुंब, कर्मचारी आदींचा समावेश होता. स्पर्धेचा समारोप आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर अरविंद रावल यांच्या हस्ते विजेत्यांना पदके आणि सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT