पुणे

#PuneIssue कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पुन्हा अपुरा पाणीपुरवठा 

सकाळवृत्तसेवा

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठ्याचे ग्रहण पुन्हा सुरू  झाल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बहुमजली इमारती असलेल्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. 

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील अरुणोदय सोसायटी, माऊलीनगर, शिवशंभोनगर ते गोकुळनगर परिसरात अनेकदा कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याचे सत्र आता पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. पूर्ण दाबाने किमान दोन तास पाणी देण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाकडून आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाणीपुरवठा टाक्‍यांना पाणी अपुरे मिळते. विचारणा केल्यास दुरुस्ती सुरू आहे, अशी थातूरमातूर कारणे सांगून वेळ मारून नेण्यात येते. केवळ महिनाभर पूर्ण दाबाने पाणी मिळाल्यानंतर पुन्हा कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. 

पाण्याची समस्या सुरू झाली, की त्याचा थेट नागरिकांच्या दैनंदिनीवर परिणाम होतो. अनेक सोसायट्यांना टॅंकरच्या पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. सर्वसामान्य सोसायट्यांना टॅंकरचे पाणी घेणे परवडत नसल्यामुळे त्यांना कमी पाण्यावर गुजराण करावी लागत आहे. अनेक वसाहतींना तर मध्यरात्रीनंतर अवेळी पाणीपुरवठा होत आहे. योग्य दाबाने व पुरेसे पाणी मिळावे, यासाठी नागरिक सातत्याने पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिक आता हतबल झाले आहेत. 
 

* सोसायट्यांना टॅंकर विकत घेण्याची वेळ 
* सोसायट्यांचे बजेट बिघडले 
* काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या 
* महिलांचा दिनक्रम बदलला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT