पुणे

कोथरूडसह शहराच्या विविध भागांत अपुरा पाणीपुरवठा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, केवळ पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्‍वासनच त्यांच्या पदरी पडत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने सत्ताधारी भाजपच्या आणखी एका लोकप्रतिनिधीला महापौरांसोबत बैठक घेण्याची वेळ आली. 

खासदार अनिल शिरोळे यांच्या पाठोपाठ आता कोथरूड भागातील पाणीप्रश्‍नी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना महापौरांकडे धाव घ्यावी लागली. या भागात दोन आठवड्यांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव आणि मोहोळ यांनी बुधवारी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे महापौरांनी आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत या भागातील पाणीप्रश्न सोडवू, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले. 
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कसबा पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, गणेश पेठ, लालबहादरू शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, पर्वती दर्शन या भागातून पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. 

"जलसंपदा'ला पत्र देणार कधी? 
जलसंपदा विभागाने महापालिकेला 1150 एमएलडीपेक्षा अधिक पाणी घेण्यास मनाई केली आहे. यामुळे शहराची गरज जास्त असूनही कमी पाणी उचलावे लागत आहे. यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे जास्त पाणी मागण्याचे पत्र दिले जाईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. मात्र त्यात अद्याप प्रगती झाली नाही. 

नवीन वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत असल्याने थोड्या अडचणी येत आहेत; परंतु येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. टाक्‍यांतील पाण्याची पातळी नियमित ठेवण्यात येत आहे. 
-प्रवीण गेडाम, अधिक्षक अभियंता, पाणीपुरवठा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT