wagholi
wagholi 
पुणे

सात कोटी रूपयांच्या विकासकामांचे वाघोलीत भूमिपूजन

निलेश कांकरिया

वाघोली (पुणे) : सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी वाघोलीतील सिद्धी विनायक पार्क सोसायटी मध्ये पार पडले. या मध्ये दोन्ही सोसायटी व गणेशनगर मधील अंतर्गत ड्रेनेज कामाचा व  वाघोली ते मांजरी पर्यंतच्या ड्रेनेज वाहिनी कामाचा समावेश आहे. ड्रेनेजच्या कामास सुरुवात होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

ग्रामपंचायत निधीतून उपसरपंच  संदीप सातव, सदस्य मालती गोगावले, जयश्री काळे यांच्या प्रयत्नातून ही कामे मार्गी लागली आहेत. मनसेचे शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, आव्हाळवाडीच्या सरपंच ललिता आव्हाळे, उपसरपंच संदीप सातव, आव्हाळवाडीचे उपसरपंच देवा आव्हाळे संजय सातव, चंद्रकांत आव्हाळे, मीना सातव, मालती गोगावले, जयश्री काळे, सुनिता सातव ,रेश्मा पाचारणे रोहिणी गोरे ,उषा सातव आदी यावेळी उपस्तीत होते. सुमारे साडेपाच कोटी रुपय खर्चून वाघोली ते मांजरी पर्यंत ड्रेनेज वाहिनी टाकण्यात येणार असून 87 लाख रुपये खर्चून तिन्ही सोसायटी मधील अंतर्गत ड्रेनेजचे काम केले जाणार आहे. उद्यान, पाणी, रस्ते आदी सुविधा पुरविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, सरपंच उबाळे, संजय सातव यांनी दिले. निवडणुकी पूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचा दावा यावेळी उपसरपंच सातव यांनी केला.

वाघोलीत ड्रेनेज समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामपंचायतीने टप्याटप्याने ड्रेनेजची  कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. सिद्धिविनायक व गणेशनगर परिसरात ड्रेनेज नसल्याने अनेकांनी पाणी उघड्यावर सोडले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. आता ड्रेनेजची व्यवस्था होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  

ग्रामनिधींचा उल्लेख गरजेचा
या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण सोशल मीडियावर टाकण्यात आले. तसेच काही ठिकाणी लावलेल्या फ्लेक्स वर ग्रामनिधीतून कामे होत असल्याचा कोठेही उल्लेख नसल्याने अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली. सदस्यांच्या प्रयत्नातून कामे मार्गी लागत असली तरी त्यासाठी ग्रामनिधी खर्च होतो. ग्रामपंचायत विकास कामांचा उदघाटन अथवा भूमिपूजन कार्यक्रम असेल तर प्रोटोकॉल पाळला जावा .तसा ठराव ग्रामपंचायतीत करावा अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT