bh.jpg 
पुणे

भिगवण कोविड केअर सेंटरचे एकाच दिवसात दोनदा उद्घाटन

सकाळवृत्तसेवा

भिगवण : येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजित कार्यक्रमापुर्वी दुपारीच भाजपच्या वतीनेही याच कोविड केअर केंद्राचे उद्घाटन इंदापुर पंचायत समिती सभापतींच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे भिगवण कोविड केअर सेंटरचे एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाल्यामुळे या भागामध्ये चर्चेला उधान आले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड महेश देवकाते, डि.एन.जगताप, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, धनाजी थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, सचिन बोगावत, विष्णुपंत देवकाते, नामदेव पाटील, संदीप वाकसे, नानासाहेब बंडगर, संतोष धवडे, तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, सरपंच अनिता संतोष धवडे उपस्थित होते. यावेळी ना. भरणे यांचे हस्ते फित कापून कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, सध्या देशासह राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आहे अशावेळी एकजुटीने या संकटाशी सामना करण्याची आवश्यकता आहे. विरोधक मात्र कोरोनाच्या काळातही राजकारण करत आहेत ही दुर्दवी बाब आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी भिगवण येथील कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. केंद्राचे उद्घाटन कोण करते याला फारसे महत्व नाही. येथील ट्रॉमा केअरच्या इमारतीसाठी वैयक्तिक लक्ष देऊन प्रयत्न केले आहेत. तालुक्यामध्ये आणखी निमगाव व बावडा येथेही कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत संतोष धवडे म्हणाले, कोविड सेंटर उभारण्यासाठी भिगवण ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने कष्ट घेतले आहे. विरोधकांनी केवळ उद्घाटन करणे ही लोकांची दिशाभुल आहे विरोधकांच्या या कृतीचा निषेध करतो. कार्यक्रमाचे संयोजन भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर तहसिल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT