पुणे

अनोख्या पक्षिजगताची सफर आजपासून 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दुर्मीळ आणि अनोख्या पक्ष्यांचा अधिवास, त्यांचे जीवनचक्र, त्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेण्याची संधी पुणेकरांना शुक्रवारी (ता. 31) आयोजित पक्षी महोत्सावात मिळणार आहे. पक्ष्यांचे पर्यावरणीय महत्त्व, वाढता मानवी हस्तक्षेप या संबंधी जनजागृती व्हावी, यासाठी आयोजित या महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ राजेंद्र नगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात सायंकाळी 6 वाजता होईल. नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या महोत्सवात माहितीपट आणि व्याख्याने होणार आहेत. 

महोत्सवाचे उद्‌घाटन वनविभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्‍चिम) सुनील लिमये यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन समारंभानंतर वन्यजीव चित्रपटकार अजय बेदी आणि विजय बेदी यांच्या "द स्टॉर्क सेव्हियर्स' या करकोच्यांवरील वन्यजीव चित्रपटाने पक्षी महोत्सवाचा प्रारंभ होईल. यानंतर पक्षितज्ज्ञ डॉ. सुरुची पांडे यांचे "भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील घुबड' या विषयावर सादरीकरण होईल. 

पक्षी अभ्यासाची मुहूर्तमेढ भारतात रोवणारे आद्य पक्षी अभ्यासक डॉ. सालीम अली यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाने पक्षी महोत्सवाची सांगता होणार आहे. जीविधा ही संस्था महोत्सवाची सहआयोजक आहेत. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक "सकाळ' असून, संजीवनी डेव्हलपर्स व जंगल बेल्स यांनी साह्य केले आहे. महोत्सवाला सामाजिक वने आणि पुणे वनविभाग (वन्यजीव) यांचे सहकार्य लाभले आहे. 

महोत्सवातील कार्यक्रम 
शनिवार (ता. 1) सायंकाळी 4 पासून 
व्याख्यान - "पक्ष्याचे उडण्याचे तंत्र' (मंगेश दिघे) 
माहितीपट - "रेझीलियन्स फिश इगल ऑफ नैवाशा' (किरण घाडगे) 
व्याख्याने - कोकणातील पक्षिजगत (अक्षय खरे), जगभरातील पक्षिवैभव (विक्रम पोतदार) 

रविवार (ता.2) 
सकाळी 6.30 - सिंहगड परिसरात पक्षी निरीक्षण सत्र 
सकाळी 10 - कार्यशाळा - पक्ष्यांची "कृत्रिम घरटी' (विश्‍वजित नाईक) 
सायं. 4.30 - माहितीपट - पक्ष्यांचे स्थलांतर, "द फिफ्थ फ्लायवे' (डॉ. संजीव नलावडे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT