पुणे

नाटंबी येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्‌घाटन

CD

महुडे, ता. २१ : नाटंबी (ता.भोर) येथे रोहिडेश्वर नैसर्गिक शेती गट नाटंबी यांनी सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्‌घाटन तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कृषी योजनेअंतर्गत भोर तालुक्यात १० शेतकरी गट स्थापन झाले आहेत. त्यांनी एकत्र येत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. विक्री केंद्रावर गटातील शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकाविलेला इंद्रायणी, आंबेमोहोर व हातसाडीचा तांदूळ, नाचणी, हळद पावडर, हापूस व केशर आंबे व भाजीपाला उपलब्ध असणार आहे. परिसरातील ग्राहक व रायरेश्वर भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हा खात्रीशीर शेतीमाल योग्य दरात मिळणार आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली विक्री केंद्राची स्थापना झाली आहे.

यावेळी तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, नाटंबीचे कृषी सहाय्यक संकल्प महांगरे, गटाचे अध्यक्ष नथू मांढरे, सचिव नारायण साळुंके तसेच गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


00730

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

Vaibhav Suryavanshi: वैभव-अर्जुन तेंडुलकरची जोडी चमकली; १४ चौकार, ७ षटकारांचा पाऊस; दोघांचे अर्धशतक

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

ST Employees : थकीत हप्ता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; वेतनवाढीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

SCROLL FOR NEXT