आळेफाटा (ता.जुन्नर) येथील दरोडा पडलेले साई इलेक्ट्रॉनिक दुकान sakla
पुणे

पुण्यात पिस्तुलाचा धाक दाखवून मोबाईल चोरून नेल्याची घटना

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : आळेफाटा या ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक दुकानातील १८ हजार रूपये रोख व मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना सोमवारी (दि ७) रात्री साडेदहा वाजता घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा (ता.जुन्नर) येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील १८ हजार रुपये व मोबाईल चोरून नेली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली. ही घटना सी सी टीव्हीत कैद झाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान दहा ते बारा दिवसांपूर्वी चौदानंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्यावर चोरट्यांनी गोळ्या घालुन ठार केले होते . या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच आळेफाटा या ठिकाणी येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन आळे ग्रामपंचायतीच्या वतीने आळेफाटा पोलीस स्टेशन निवेदन दिले असुन या निवेदनात म्हटले आहे की येथील तपास पोलीसांणी जलद गतीने करून आळेफाटा परीसरातील गस्तीची प्रमाण वाढवून परप्रांतीय लोकांची चौकशी करावी तसेच या ठिकाणी असलेल्या सर्व व्यापा-यांची बैठक बोलवुन चो-या होऊन नयेत यासाठी प्रतिबंधकउपाय योजनेची चर्चा व्हावी अश्या मागणीचे निवेदन आळे गावचे सरपंच प्रितम काळे उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT