train
पुणे

धावत्या गोवा एक्सप्रेसमधून एकाला बाहेर फेकल्याची घटना

सावता नवले

कुरकुंभ : मनमाडहून-पुण्याकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत प्रवासादरम्यान दोन तरूणांमध्ये पिण्याच्या पाण्यावरून वाद विकोपाला गेल्याने एका तरूणाने दुसर्‍याला धावत्या रेल्वेगाडीतून खाली फेकून दिल्याने 33 वर्षीय तरूण गजानन राठोड (ता. हिंगोली) जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता.15) गोवा एक्स्प्रेस पुण्याकडे जाताना दौंड काॅडलाईन-केडगाव रेल्वे प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका तरूणाविरूद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ( ता. 15 ) मनमाडकडून पुण्याकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेसमध्ये गजानन राठोड ( वय 33, रा. खानापूर सावरगाव, ता. हिंगोली ) व नितीन दीपक जाधव ( वय 21, रा. गोंदणवी नेहरूनगर श्रीरामपूर, जि. नगर ) या दोन तरूणांमध्ये पिण्याच्या पाण्यावरून वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात नितीन जाधव याने गजानन राठोड यांना धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने गजानन राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना गोवा एक्स्प्रेस दौंड पुण्याकडे जात असताना दौंड काॅडलाईन ते केडगाव दरम्यान घडली. गजानन राठोड यांना रेल्वेतून फेकून दिल्यानंतर आरोपी नितीन जाधव याने रेल्वेगाडी इमर्जन्सी थांबवण्यासाठी असणारी साखळी ओढून रेल्वे थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी शिताफीने आरोपी जाधव याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गजानन राठोड याला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची कबुली दिल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपी नितीन जाधव यांच्याविरूध गुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे. लोहमार्ग पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर पुन्हा अपघात, ट्रकचा ब्रेक झाला फेल

'ते' पुन्हा आले...! निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक, चला हवा येऊ द्या नाहीतर 'या' शोमध्ये दिसणार जोडी

Latest Marathi News Live Update : पुण्यात ई-स्क्वेअर थिएटरजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराचा परिसर होणार आणखी मोठा; बाहेरील भिंतीजवळची जमीन खरेदी करण्याचा निर्णय का?

Lionel Messi In India : ‘वानखेडे’वर मेस्सीचा ‘जयघोष’; फुटबॉलप्रेमींच्या शिस्तबद्धतेला सलाम; सचिन-लियोनेल एकत्र...

SCROLL FOR NEXT