Inconvenience at Vaikuntha Cemetery workers are not getting their salaries on time PF and other facilities sakal
पुणे

पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत असुविधा

कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही, पीएफ व इतर सुविधा मिळत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अपुरे कर्मचारी असल्याने तेथील कामावर परिणाम होत असून, नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही. बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच तेथील कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही, पीएफ व इतर सुविधा मिळत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वैकुंठ स्मशानभूमीत कोणतीही गैरसोय होत नसल्याचा दावा केला आहे.

शहरात सर्वाधिक अंत्यसंस्कार हे वैकुंठ स्मशानभूमीत केले जातात, रोज किमान १० ते १५ शव दहन केले जातात. या ठिकाणी पारंपारिक पद्धतीसह विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. यापूर्वी वैकुंठ स्मशानभूमीत आरोग्य विभागाचे कर्मचारी होते, पण आता ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. तीन पाळ्यांसाठी १४ कर्मचारी काम करत आहेत.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले,‘‘वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जाणे झाले, त्यावेळी अंत्यविधीला वेळ होत असल्याचे जाणवले. पण तेथे अपुरे कर्मचारी असल्याने तेथे योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही. तेथील कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही, पीएफ, इएसआयही यातही तफावत आहे. येथील शेडमध्ये अस्वच्छताही आहे. महापालिकेने येथील व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले, ‘‘ठेकेदाराकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले आहे, या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर दिले जाते. पीएफ व इएसआय याची तपासणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT