पुणे

पूल वाहून गेल्याने पुण्यातील नागरिकांना पाणी, गरजेच्या वस्तूं कशा आणाव्या लागतात एकदा पाहाच!

सावता नवले

कुरकुंभ : मळद (ता. दौंड) येथील तलाव निकृष्ट दर्जामुळे फुटून ओढयाला पूर आल्याने कोल्हे-सय्यदवस्तीजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पाण्यामुळे  दळणवळण ठप्प झाल्याने पिण्याचे पाणी, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची गैरसोय होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड तालुक्यात 14 ऑक्टोबर 2020 रोजी जोरदार पाऊस झाल्याने मळद येथील निकृष्ट काम झालेला तलाव फुटला. त्यामुळे ओढयाला पूर आल्याने कोल्हे-सय्यदवस्तीजवळील पूल वाहून गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.

ओढयात पाणी जास्त असल्याने वाहने जाणे बंद झाले आहे. त्यामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाणे अवघड बनलेले आहे. पिण्याचे पाणी, किराणा माल, दळण, शेतीमाल वाहतूक, खतं, औषधं, बियाणांची इत्यादी वस्तूची आणणे अवघड झाले आहे. अत्यंत आवश्यकता असल्यास तरूण ओढयावर दोन्ही बाजूला बांधलेल्या ठिबक नळयांचा आधार येऊन पाण्यातून जीवधोक्यात घालून येजा करीत आहेत.

19 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,  विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार राहुल कुल यांनी सदर ठिकाणी भेट देऊन ओढयाच्या दुसर्‍या बाजूला उभ्या असणाऱ्या महिला, ग्रामस्थांशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या होत्या.

यावेळी ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी केली होती. पूल वाहून गेलेल्या घटनेला पंधरा दिवस झाले तरीही शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सध्या पिण्याचे शुद्ध पाणी व जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी अडचणी येत असल्याने ग्रामस्थ,  महिला त्रस्त आहेत. त्यामुळे कोल्हे - सय्यदवस्तीवरील ग्रामस्थांकडून पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT