Hadapsar Railway Station sakal
पुणे

हडपसर रेल्वे स्टेशनवर होतेय प्रवाश्यांची गैरसोय !

हडपसर रेल्वे स्थानकाचे काम अपुर्ण आहे. प्लॅटफार्म २ व ३ वर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह व शौचालयाचे काम झालेले नाही. वेटिंग रूम नाही, कॅन्टीनची सुविधा नाही.

कैलास गावडे

मुंढवा - पुणे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. गेल्या काही दिवसापासून बंद असलेली पुणे-हैद्राबाद रेल्वे येथून शुक्रवारी ९ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून हैदराबाद साठी विशेष गाडी रवाना झाली होती. ती आठवड्यातून रविवार, मंगळवार व शुक्रवार तीन दिवशी धावत आहे. सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान येणाऱ्या गाडीतून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची भरपूर गर्दी असते. परंतु हडपसर रेल्वे स्टेशनवर आल्यावर प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रेल्वे स्थानकाचे काम अपुर्ण आहे. प्लॅटफार्म २ व ३ वर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह व शौचालयाचे काम झालेले नाही. वेटिंग रूम नाही, कॅन्टीनची सुविधा नाही. प्लॅटफार्म अपुर्ण अवस्थेत आहे. पार्कींगसाठी जागा नाही, रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अतिशय अरूंद आहे. जेष्ठ नागरिकांना सामानासहित जिना चढून येणे जिकीरीचे आहे. या असुविधांमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत.

हडपसर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाश्यांना निगडी भोसरी, पुणे स्टेशन, चांदणी चौक व मांजरी अशा विविध ठिकाणी जायचे असते, पण येथून बस किंवा रिक्षाची पुरेशी संख्या नसल्याने त्यांना तासन तास ताटकळत थांबावे लागते. कुठे जायचे ते कळत नाही. रेल्वे स्थानकावरून ताडीगुत्ता चौक, मुंढवा, तुलसी हॉल चौक, महात्मा फुले चौक या ठिकाणी सामान घेवून सुमारे एक किलोमीटर चालत जावे लागते.

प्रवाश्यांच्या प्रतिक्रीया -

नागेश नाकाडे (सेवानिवृत नौदल अधिकारी) -

रेल्वे स्थानकावर पाणी, टॉयलेट, सुविधा नाहीत. पुणे मेट्रोपॉलिटीयन सिटी असल्यासारखे वाटत नाही. येथून पुणे स्टेशनला जाणेसाठी बस किंवा लोकल सुरू केल्यास प्रवाश्यांसाठी सोयीचे होईल.

बसवराज बिराजदार (बिदर, कर्नाटक) -

हे पुण्यातील रेल्वे स्टेशन वाटत नाही. येथे प्रवाश्यांना थांबायला जागा नाही. ना अॅटो ना बस हे तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचे रेल्वे स्टेशन वाटते. पुण्यातील प्रवाश्याना हैद्राबादला जाताना हडपसर रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे.

सागर माडच्चेट्टी (हैदराबाद) -

रेल्वेने या ठिकाणी जेष्ठ नागरिक प्रवाश्यांची पर्वा केलेली नाही. त्यांना जिन्यावर मोकळे चढणे शक्य नाही. मग सामान घेवून कसे चढतील. येथे जिन्यावर चढण्यासाठी एक्सकलेदिटर नाही. दुर जायचे म्हटल्यास रिक्षावाले भाडे नाकारतात. ओला गाड्यांना हडपसर रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले तर नाव ऐकून टाळाटाळ करतात.

तानाजी साळुखे (कुर्डूवाडी, सोलापूर) -

रेल्वे स्थानकावरून जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही. पुण्यात जाण्यासाठी रिक्शावाले अडवणूक करून अधिक पैश्याची मागणी करतात. बरोबर कुटूंब असल्यामुळे तेवढे पैसे द्यावेच लागतात.

सुनिल कामथे (स्थानिक रहिवाशी) -

रेल्वे स्टेशनसमोर गाडी आल्यावर वाहनांची एकच गर्दी झाल्याने नेहमी वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. येथे प्रवाशी तासभर ताटकळत थांबतात. प्रवाश्यांना जाण्यासाठी बसची सोय नाही. पुर्वी येथून सुरू असलेली १६८ बस मनपाने बंद केली आहे, ती पुन्हा सुरू केल्यास प्रवाश्यांची गैरसोय टळेल.

याबाबत रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एस.एस मिश्रा यांना दोन वेळा फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT