coronaa1.jpg
coronaa1.jpg 
पुणे

नांदेड, किरकटवाडी, खडकवासल्यात कोरोनाचा विळखा

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून नांदेड, किरकटवाडी, खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येत आज पुन्हा नवीन 10 रुग्णांची भर पडल्याने या तीन गावांतील आत्तापर्यंतची रुग्ण संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. आज नांदेड येथील 5, किरकटवाडी येथील 1 तर खडकवासला येथील 4 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली.

सध्या नांदेड येथे 5 किरकटवाडी येथे 5 व खडकवासला येथे 2 मायक्रो कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत. आत्तापर्यंत नांदेड येथे एकूण 16 रुग्ण आढळले असून यापैकी 1 रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे. तर एकाचा मृत्यू झालेला आहे व 14 रुग्ण उपचार घेत आहेत. किरकटवाडी येथे आतापर्यंत एकूण 14 रुग्ण आढळले असून यापैकी 5 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खडकवासला येथे आतापर्यंत एकूण 11 रुग्ण आढळले असून यापैकी 4 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली.

दरम्यान खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 36 आशा वर्कर, 6 आरोग्य सेविका, 2 आरोग्य सहायक 2 आरोग्य सेवक, 2 क्लार्क, 2 वाहनचालक, 4 शिपाई, 1 डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी असे सर्व मिळून 60 कर्मचारी अहोरात्र कोरोना विरोधात लढा देत आहेत‌‌. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांवरही मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात नागरिकांनीही नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास या गावांमध्ये पुढील चित्र भयानक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT