Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : वाघोलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत अपघाताच्या प्रमाणात वाढ

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावर वाघोलीतील पानमळा परिसरात घडली. वाघोली व परिसरात अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावर वाघोलीतील पानमळा परिसरात घडली. वाघोली व परिसरात अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. दीपक हा १४ दिवसातील आठवा बळी ठरला. एवढे अपघात होवूनही प्रशासन मात्र सुस्त आहे.

दीपक गोविंद साळुंके (वय २७, रा. वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय साळुंके यांनी फिर्याद दिली असून अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुतांश अपघातातील बळी हे ट्रक, कंटेनर, डंपर या वाहनांच्या धडकेने गेले आहेत.

दुचाकीवरील तरुण तरुणी अपघातात बळी जात आहेत. वाघोली परिसरात पुणे नगर महामार्गावर नेहमी वाहतूक असते. यामुळे वाहनांची गती नियंत्रणात असायला हवी.मात्र ट्रक, कंटेनर, डंपर यांच्या गतीला सीमाच नसते.

अतिशय बेदारकपणे ते वाहने चालवतात. यामुळे दुचाकी वरील वाहनचालकांचा बळी जातो. अपघातानंतर अनेक वाहन चालक पळून जातात. या वाहनावरील चालक वाहन चालवताना अनेक वेळा मोबाईल मध्ये बोलण्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होते. चालक तरुण असल्याने त्यांची चालवण्याची गती अधिक असते.

अनेक वाहनांची तर अवस्थाही वाईट असते. या वाहनांवर व चालकांवर नियंत्रण आणण्याचे काम वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय या दोघांचे आहे. मात्र ते अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. आर टी ओ अधिकारी तर कुठे तरी रस्त्यावर थांबुन केवळ आर्थिक तडजोडी करण्यात व्यस्त असतात. असा आरोप नागरीक करीत आहेत. हे अपघातांचे सत्र थांबले नाही तर एके दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

SCROLL FOR NEXT