Increase in oxygen patients in Pune Team Esakal
पुणे

पुण्यात ऑक्सिजनवरील रुग्णांत वाढ

नऊ दिवसांमध्ये एक हजार १२४ जणांची भर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ऑक्सिजन लागणाऱ्या कोरोनाबाधीतांची संख्या गेल्या नऊ दिवसांमध्ये एक हजार १२४ ने वाढली असल्याची माहिती पुढे आली आहे. १० एप्रिलला चार हजार ७४६ रुग्ण ऑक्सिजनवर होते. ही संख्या आता पाच हजार ८७० पर्यंत वाढल्याचे दिसते.

शहरात कोरोनाचा उद्रेक प्रचंड वेगाने वाढत आहे. रोज सुमारे पाच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यापैकी काही रुग्णांना दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छाप लागणे, श्वास गुदमरणे असे त्रास होतात. सामान्य माणसाच्या रक्तातील ऑक्सिजन ९५ ते १०० टक्के असते. मात्र, काही कोरोनाबाधीतांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो.

Increase in oxygen patients in Pune

शहरातील ऑक्सिजनवर जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी वाढण्यावर झाला आहे, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

पुण्यात १८ फेब्रुवारीला ३०८ रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यावेळी अत्यवस्थ रुग्णांची संख्या १५४ होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरु झाला. त्यामुळे ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ३०८ वरून पाच हजार ८७० पर्यंत वाढली. तर, सद्यःस्थितीत एक हजर २५० रुग्ण अत्यवस्थ आहेत, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी प्रत्येक दिवशी ३०० ते ३५० मेट्रिक टनापर्यंत होती. मात्र, आता ही मागणी प्रतिदिन ३७५ मेट्रिक टनापर्यंत वाढली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यापैकी ७० टक्के ऑक्सिजनचा एकट्या पुणे शहरात पुरवठा करण्यात येतो, असेही स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT