Mental Support 
पुणे

कोरोना रुग्णांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ; कुटुंबालाही हवा मानसिक आधार 

सम्राट कदम

पुणे : कोरोनासंबंधी उपचार चालू असताना आणि उपचारानंतरही रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, बाधितांच्या कुटुंबाचे स्वास्थ्यही या काळात मोठ्या प्रमाणावर बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी बाधितांसह त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. उपचारादरम्यान विलगिकरणात राहणे, कुटुंबाची ताटातूट होणे, अपराधीपणाची भावना आणि कोरोना झालाय हे मनाने न स्वीकारणे, यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या चक्रातून आपल्या सर्वांनाच जायचे आहे. बऱ्याचदा रूग्ण स्वतःला कोरोना झाल्याचे स्वीकारत नाही. परिणामी त्याचा मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. कोरोनातून सावरलेल्या रुग्णांनाही पुन्हा कोरोना होईल का, अशी भीती आहे. तसेच आजूबाजूच्या वातावरणामुळे लोकांमध्ये एक भीतीची लाट आहे. त्याचा थेट परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो.’’ कोरोनाचा आघात शरिराबरोबरच मनावरही मोठ्या प्रमाणावर होतो. अशा वेळी रुग्णाला मानसिक आधार द्यायला हवाच, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबालाही समाजाने आधार द्यायला हवा. 

  • - नैराश्य, काही करावेसे न वाटणे, शारिरिक थकवा जाणवणे. 
  • - काळजी, चिंता, भीती, तीव्र कोटीचे दुःख 
  • - शंकेखोर होणे, मंत्रचळ होणे 
  • - उपचारा दरम्यान संभ्रमावस्था, चिडचिडेपणा 

स्वास्थ्य सुधारण्यासाठी हे कराच... 
१) रूग्ण :

  • - घाबरून न जाता शांतपणे रहा 
  • - रोजनिशी लिहा 
  • - मित्रांशी फोनवर बोला, गप्पा मारा 
  • - योगासने, ध्यान धारणा करा 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२) कुटुंब आणि समाज 

  • - रूग्णाला मानसिक आणि भावनिक आधार द्या 
  • - आम्ही सोबत असल्याचे सांगा 
  • - रूग्णाबद्दल आणि कुटुंबाबद्दल सहानुभूती बाळगा 
  • - बाधित कुटुंबातील कोणी मृत्यू पावल्यास समाजाने भावनिक आधार द्यावा 
  • - या काळात कुटुंबाच्या आवश्यक अडचणींना समाजाने सोडवावे 
     

कोरोना काळात कुटुंबात एकमेकांना धीर द्यावा आणि समाजाने कुटुंबाला धीर देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने च्या घरात काही वाईट घडले तर अधिक लक्ष द्यायला हवे. रुग्णाची लक्षणे अधिकच तीव्र असल्यास मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
- डॉ. राहुल बागले, मनोविकार तज्ज्ञ, अपोलो रूग्णालय, पुणे 

कोरोनातील विलगिकरणामुळे रुग्णाची मानसिकता खचते, कुटुंबालाही भीतीने ग्रासल्यासारखे होते. सध्या १० पैकी तीन ते चार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मंत्रचळाची समस्या जाणवते. अशा वेळी दोघांच्याही मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 
- डॉ. निकेत कासार, मनोविकार तज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Anna Bhau Sathe Jayanti : कोणतेही औपचारिक शिक्षण नाही, तरीही रचला इतिहास! डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अन् अण्णा भाऊंच्या प्रतिभेचा असा होता संगम

Latest Marathi News Live Update : अमित शहांचा पुणे दौरा, आंदोलनाआधी काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Abhijit Dipake: योगी, मोदी, BJP आयटी सेलचे लोक शिवीगाळ करतात, त्यांच्यावर FIR का नाही? अभिजीत दिपकेंचा सवाल

SCROLL FOR NEXT