पुणे

पुण्यातील 4 धरणात मिळून पाणीसाठ्यात दीड TMCची वाढ

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गुरुवार, शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. गेली २० दिवस पाऊस पडल्याने चार ही धरणात मिळून दीड टीएमसीने अधिक वाढ झाली आहे. परंतु शनिवार पासून पाउस कमी होत गेला आहे. (Increase of one and a half TMC for water in four dams pune)

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, आज सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या चार धरणात मिळून ७.९४ टीएमसी म्हणजे २७.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुधवारी दि.१६ जून रोजी सकाळी सहा वाजता चार ही धरणात ६.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजे आज अखेर १.३२० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. याच बरोबर मागील बुधवार पासून पुणे शहर व परिसरातील पाणी योजनेसाठी सोडले ते मिळून सुमारे दीड टीएमसीची वाढ झालेली दिसून येते.

धरण क्षेत्रातील पाउस थांबला

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, आज मंगळवारी सकाळी सहा वाजता २४ तासात झाला. या दिवशी टेमघरला ११०मिलीमीटर पाऊस झाला होता. तर वरसगावला ५१, पानशेत ५६ तर खडकवासला येथे ४५ मिलिमिटर पाऊस झाला होता. त्यानंतर शनिवार, रविवार पाऊस कमी होत गेला. सोमवारी सकाळी ऊन, दुपारी ढगाळ वातावरण होते. अशीच परिस्थिती आज मंगळवारी पण असेल. मंगळवारी सकाळी सहा वाजता २४ तासात तासात पडलेला पावसाची आकडेवारी पहिली असता पाउस थांबल्याचे चित्र पहावयास मिळाले. खडकवासला येथे ०, पानशेत १, वरसगाव २ व टेमघर २० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणाचे नाव- टीएमसी / टक्केवारी

खडकवासला- १.२०/६०.८६

पानशेत- ३.७४/.३५.१८

वरसगाव- २.४९/१९.४५

टेमघर- ०.५०/१३.५३

चार धरणात मिळून ७.९४ टीएमसी २७.२५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT