Gas Cylinder Sakal
पुणे

सिलिंडर दरवाढीने मजूर अड्ड्यावरील महिला करत आहेत सरपण गोळा

महागाईचा भडका उडाल्याने मजूर अड्ड्यावरील महिलावर्गाने तीव्र संताप व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

महागाईचा भडका उडाल्याने मजूर अड्ड्यावरील महिलावर्गाने तीव्र संताप व्यक्त केला.

उंड्री - महागाईचा भडका उडाल्याने मजूर अड्ड्यावरील महिलावर्गाने तीव्र संताप व्यक्त केला. कोरोना महामारीमुळे चार-पाच दिवसांनी रोजगार मिळतो, त्यात घरखर्च आणि कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे औषधपाणी कसे करायचे, दुसरीकडे गॅस सिलिंडरने हजारी पार केली. गरिबाला कोणी वालीच नाही का, अशी विचारणा उंड्री (ता. हवेली) येथील मजूर अड्ड्यावरील मजूरवर्गाकडून केली जात आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे हाताला काम नव्हते. काही दिवसांपासून कसा तरी रोजगार मिळू लागला. मात्र, उन्हाचा कडाका वाढला आणि रोजगार कमी झाला. त्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी ठेकेदाराची विनवणी केल्यानंतर कुठे आठवड्यातून तीन-चार दिवस हाताला काम मिळते. त्यातून कसातरी संसाराचा गाढा ओढतो आहे. त्यातच आता पुन्हा गॅस सिलिंडरची किंमत वाढल्याने स्वयंपाक करण्यासाठी कामावरून घरी येताना सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे.

उंड्री चौकातील मजूर अड्ड्यावर अडीचशे-तीनशे मजूर रोजगारासाठी सकाळी थांबतात. उपनगरालगतच्या गावात बांधकामावर काम करणारा मोठा वर्ग आहे. गरजेनुसार ठेकेदारांकरवी त्यांना रोजगार मिळतो. रोजगारात वाढ होण्याऐवजी कपात होत असल्याची व्यथा कमल वडजकर, अनिता कांबळे यांनी मांडली.

गावाकडे दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शहराकडे रोजगारासाठी आलो. मात्र, इथेही रोजगार देणाऱ्यापेक्षा मागणाऱ्यांची संख्या वाढल्याने रोजगार मिळत नाही. आम्हाला फुकट काही नको, हाताला काम द्या, त्यातून आम्ही स्वाभिमानाने जगू.

- भिवरा कांबळे, उंड्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT