पुणे

अल्पवयीन मुले, तरुणांमध्ये 'बदला फॅक्‍टर' ठरतोय जीवघेणा

मुले, तरुणांकडून गंभीर गुन्हे; पोलिसांकडून होतेय कडक कारवाई

पांडूरंग सरोदे

पुणे : ‘त्याने माझ्या मित्राला मारले’, ‘तू गल्लीतून ये-जा करताना माझ्याकडे डोळे वटारून खुन्नस का देतो’ अशा किरकोळ कारणांपासून ते ‘तुम्ही भाईचा खून केला’, ‘माझ्या भाच्यावर वार करून त्याचा खून केला’, अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले व तरुणांमध्ये बदला घेण्याचा प्रकार सुरू आहे. यामधून एखाद्यावर जीवघेणा हल्लाच नाही, तर थेट खून करण्यापर्यंतच्या घटना घडत आहे. (increase revenge feeling among minors and youth causes fatal attack and murder)

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्यात येत आहेत. अनेक गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) लावला जात आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगार शांत आहेत. मात्र दुसरीकडे वस्त्या, गल्ल्यांमधील ‘भाई’च्या दादागिरीचे प्रमाण वाढत आहे.

गंभीर व किरकोळ गुन्हे करणारे आपले वर्चस्व निर्माण करत आहेत. बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन मुले व तरुणांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यातूनच एकमेकांचा बदला घेण्याची वृत्ती बळावत आहे. या प्रकाराचा संबंधित तरुण, व्यक्तींनाच नाही, तर स्थानिक नागरिकांनाही फटका बसत आहे. वाहनांची तोडफोड, जाळपोळ, घरे किंवा दुकानांची तोडफोड अशा घटना त्यातून घडत आहेत.

काय परिणाम होतो?

  • लहान मुले गुन्हेगारांकडे आकर्षित होतात

  • लहान वयातच गुन्हेगारीकडे वळण्यास सुरवात होते

  • नागरिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण तयार होते

  • तोडफोड, जाळपोळीच्या घटनांमध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान

भाच्याच्या खुनाचा बदला

आंबेगाव पठारावर राहणाऱ्या संग्राम लेकावळे व सौरभ वाघमारे यांची एकमेकांशी ओळख होती. त्यातूनच संग्राम हा लहान असलेल्या सौरभला किरकोळ कामे सांगणे, येता-जाता हाताने त्याच्या डोक्‍यात मारण्याचे प्रकार करीत होता. त्या रागातूनच सौरभने एप्रिल महिन्यात संग्रामचा खून केला. त्यानंतर संग्रामचा मामा वृषभ रेणुसे याने साथीदारांच्या मदतीने संग्रामच्या खुनाचा बदला म्हणून १४ जून रोजी सौरभ वाघमारेचा खून केला.

ठेकेदारावर गोळीबार

बांधकाम ठेकेदार रवींद्र तागुंदे याच्यावर टोळक्‍याने ५ जून रोजी गोळीबार केला होता. खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणी अभिजित तुकाराम येलवांडे, नकुल श्याम खाडे, चेतन चंद्रकांत पवार, उमेश चिकणे अटक केली. आरोपींचा मित्र दीपक सोनवणे याच्या खुनाच्या प्रकरणात तागुंदेचा सहभाग होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूनचे चौघांनी तागुंदेवर गोळीबार केल्याचे उघड झाले.

''अल्पवयीन मुलांना कायद्याने संरक्षण असले तरीही त्यांच्याकडून घडणाऱ्या गुन्ह्यांची पोलिसांकडून बारकाईने नोंद ठेवली जाते. गुन्हेगारीकडे वळणारी अल्पवयीन मुले असोत किंवा किरकोळ कारणांवरून गंभीर गुन्हे करणारे तरुण असो, या सगळ्यांची पोलिसांनी यादी बनविलेली असते. वेळोवेळी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. किरकोळ गुन्हेही घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते.''

- श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

रायझिंग स्टार’वर कारवाई

गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ‘रायझिंग स्टार’ ही संकल्पना राबविली जात आहे. त्याअंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गुन्हेगार, किरकोळ व गंभीर गुन्हे करणाऱ्या तरुणांची नोंद ठेवली जाते. संबंधित तरुणांवर वेळोवेळी कारवाई करतानाच त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कायद्याचा वापर करून कडक कारवाई करण्यावर पोलिसांकडून भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT