Social Media 
पुणे

सोशल मिडीयामुळे नागरीकांच्या अस्वस्थेत वाढ; कोरोनाबद्दलच्या संदेशामुळे अस्वस्थता

जयदीप हिरवे

सातगाव पठार : सध्या सगळीकडेच कोरोनाने आपले हात पाय पसरले आहेत. रोज वाढणारी रूग्ण संख्या, वाढलेला मृत्युदर हा नक्कीच धडकी भरवीणारा आहे. याचा परिणाम सोशल मिडीयावर दिसून येत आहे. सोशल मिडीयावरील फेसबुक, व्हॉट्सॲपवर येणारे रोजचे रूग्णवाढीचे आकडे पाहून नागरीकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक जण आता सोशल मिडीयापासून दुरच राहणे पसंत करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मिडीया वापरण्याचे नागरीकाच्या प्रमाणात खुप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रत्येकाच्या हातातच आता स्मार्टफोन आल्याने त्यावरील व्हॉट्स ॲप ग्रुप देखील वाढले आहेत. मात्र आता हेच व्हॉट्स ॲप ग्रुप आता नागरीकांना नकोसे झाले आहेत.

कोरोनाकाळातही जगासह आपल्या आजूबाजूची स्थानिक स्थिती कळणे सोशल मिडीयामुळे शक्य झाले आहे. किती कोरोणाबाधीत आढळले, किती बरे झाले, किती जणांचा मृत्यु झाला याबाबत सोशल मिडीयावर तातडीने माहिती उपलब्ध होवू लागली. सुरवातीला ग्रामीण भागात कोरानाबाधीत कमी प्रमाणावर सापडत होते मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने ग्रामीण भागातही आपले वर्चस्व वाढवले आहे.

कोरोना होवू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत देखील सोशल मिडीयावर वारंवार येत असलेली माहिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरीक अधिक खबरदारी घेवू लागले आहेत. मात्र याचे रूपांतर कुठेतरी भितीत होवू लागले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मिडीयापासून दूरच राहणेच सध्यातरी अनेक जण पसंत करत आहेत.

कोरोना काळात सकारात्मक विचार ऐकणे, वाढविणे आवश्यक आहे. सोशल मिडीयावर याबाबत सकारात्मक बाबींवर अधिक भर दिला पाहीजे. सोशल मिडीया वापरात तरूणाई आघाडीवर आहे त्यामुळे तरूणाईने याबाबत दखल घेत कोरोनाबाबत सोशल मिडीयावर सकारात्क पोस्ट अधिक जादा प्रमाणावर कशा देता येतील हे पाहीलं पाहीजे. - महेंद्र एरंडे, प्राथमिक शिक्षक, थुगाव, ता. आंबेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT