Increase water storage in dams Pune district by 61 TMC monsoon rain forcast Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात ६१.४२ टीएमसीने वाढ

जिल्ह्यातील धरणांत आता एकूण ७८.३१ टीएमसी पाणी : शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा आता ७८.३१ टीएमसी इतका झाला आहे. हाच पाणीसाठा १४ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जून २२ रोजी अवघा १६.८९ टीएमसी इतका अल्प झाला होता. दरम्यान, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षीच्या याच तारखेपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा ३८.७० टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत सर्व धरणांत मिळून एकूण ३९.६१ इतका पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, खडकवासला, कलमोडी, आंद्रा ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. जूनच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती. शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता, असे जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून उघडकीस आले आहे.

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यामध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे. यापैकी गेल्या वर्षभरात २००.९७ टीएमसी पाणी वापरले गेले होते, असेही या अहवालातून स्पष्ट झाले होते.

प्रमुख धरणांतील शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • माणिकडोह - ३.९९

  • येडगाव - १.६३

  • वडज - ०.६८

  • डिंभे - ४.३०

  • चासकमान - ५.१८

  • भामा आसखेड - ५.०८

  • आंद्रा - २.९२

  • पवना - ४.३४

  • वरसगाव - ५.८२

  • पानशेत - ५.१३

  • खडकवासला - १.९४

  • गुंजवणी - २.२४

  • भाटघर - ९.७६

  • वीर - ७.५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, ९७ टक्के झालं; उर्वरित मे पर्यंत पूर्ण होणार

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Malaria Risk in Summer: पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यातही वाढतोय मलेरियाचा धोका; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं

Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

Latest Marathi News Live Update: पिक विम्यावरून शेतकऱ्यांचा संताप! 29 एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा

SCROLL FOR NEXT