‘इण्डेन’च्या सिलिंडरचा पुरवठा अनियमित
ग्राहक त्रस्त; साताऱ्यात कार्यालयाबाहेर ग्राहकांची रांग
सातारा, ता. ८ ः गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नसल्याने इण्डेन कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. येथील बाँबे रेस्टॉरंट चौकानजीकच्या म्हावशे इण्डेन गॅस कंपनीच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांनी सिलिंडरसह रांग लागलेली असते. या ग्राहकांना गॅस सिलिंडर कार्यालयात मिळणार नाही. सिलिंडर केवळ घरपोच केला जाईल, असे कंपनीद्वारे स्पष्ट केले आहे. सिलिंडर घेऊन ग्राहक कार्यालयात येत असल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर वितरणात अनियमितता आहे. यामुळे येथे यावे लागत आहे. दरम्यान, गॅस सिलिंडर घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर गॅसची नोंदणी होईल, तसेच केवायसी पूर्ण केल्याशिवाय गॅस मिळणार नाही, तसेच वितरण घरपोच केले जाईल, असे म्हावशे इण्डेन गॅस कंपनीच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
........
काेट
............
पुरवठा विभागाद्वारे गॅस सिलिंडर कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल घेतला जातो. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले जाते. संबंधित कंपनीच्या सेल्स कार्यालयालाही आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
- वैशाली राजमाने,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.
W17649 आणि
W17650
सातारा ः म्हावशे इण्डेन गॅस कंपनीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी गॅस सिलिंडरसह ग्राहकांची लागलेली रांग.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.