Indapur Accident 
पुणे

Indapur Accident: इंदापूरमध्ये दुचाकीस्वाराला चिरडले; एकाचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक

सकाळ वृत्तसेवा

संतोष आटोळे

इंदापूर ता.24- इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर शहर बाह्यवळणाच्या जवळ एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर संतप्त जमावाने सदर ट्रक पेटवून दिला. या अपघातात दशरथ मारुती चोरमले (वय 50 वर्षे, काळके वस्ती, गलांडवाडी नंबर 1 ता.इंदापूर) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक नंबर (MH 32 AJ 9273) हा सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाला होता.या दरम्यान दुचाकी क्रमांक (MH 42 C 5604) वरून दशरथ मारुती चोरमले हे शहरात दूध विक्री करुन घरी निघाले असता त्यांना या ट्रकने चिरडल्याची प्राथमिक माहिती आहे.

यावेळी संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याची माहिती मिळत आहे.

पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT