इंदापूर, ता. ३ : तालुक्यातील तरंगवाडी येथे शेतकऱ्याच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश असून, इंदापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती गोपाळ बुनगे (वय ७०, व्यवसाय शेती, रा. तरंगवाडी, ता. इंदापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे फिर्यादीच्या पत्नीच्या निदर्शनास आले. त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने फिर्यादी व त्यांच्या मुलाला तत्काळ बाहेर पडता आले नाही.
चोरीस गेलेल्या ऐवजात १ लाख १० हजार रुपये किमतीचा २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, १ लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे घड्याळ, ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची मणी, ३५ हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे नथ, ११ हजार ५०० रुपये रोख आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे. इंदापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.