Seema Nikam sakal
पुणे

Indapur Crime : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासू सासऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

सासरच्या छळास कंटाळून सीमा सदाशिव निकम या विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

संतोष आटोळे

इंदापूर : तालुक्यातील बोराटवाडी येथे सासरच्या छळास कंटाळून सीमा सदाशिव निकम या विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे सासू, सासरा व दिर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती अखेर महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या दारातच अंत्यविधी केला.

याबाबत मयत महिलेचे वडील शिवाजी भिकु मोरे (वय-57 वर्षे) (रा. डोंबाळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मागील तीन चार वर्षापुर्वी जावई सदाशिव महादेव निकम याचा इंदापुर परिसरात अपघात झाला होता. त्यामध्ये त्यास 70 टक्के अपंगत्व झाला होता. त्यानंतर तो अंथरूणावरच पडुन होता.

त्यानंतर मुलगी सिमा ही जावयाच्या नावाची अडीच एकर शेती कसत होती. त्यासाठी ती मोटर चालु करण्यासाठी मुलगा रोहीत याचेसोबत शेतात गेली असता तिचा सासरा महादेव रामचंद्र निकम हा तिचे पाठीमागे जायचा व तिचा हात पकडुन तिचे अंगाशी छेडछाड करायचा.त्यास मुलगी सिमाने विरोध केला असता तिचा मानसिक व मानसिक छळ केला.

तसेच मागील तीन वर्षात मुलगी सिमा हिचा सासरा महादेव निकम, तिची सासु संपता महादेव निकम व दीर गोविंद महादेव निकम यांनी ती मुला बाळांसह घर सोडून निघुन जावी याकरीता तिचा शारीरीक व मानसिक छळ चालु केला होता, तसेच तिला सासु सासरे व दिरांनी वेळोवेळी मारहाण देखील केल्याचे मुलगी सिमाने फिर्यादीस सांगीतले होते.

परंतु मुलगी सिमा हिस मोठा मुलगा रोहीत वय 16 वर्षे व लहान मुलगा सुरज वय 13 वर्षे ही दोन मुले असल्याने त्यांच्या भविष्याचा विचार करून तिने सदरचा जाच सहन केला होता. त्यानंतर मागील 15 दिवसापुर्वी सिमा हिस तिचा सासरा महादेव निकम, तिची सासु संपता महादेव निकम व दीर गोविंद महादेव निकम यांनी मारहाण केली होती.

तसेच त्यावेळी सिमाचा मुलगा सुरज हा मध्ये पडला असता महादेव निकम याने कु-हाड घेवुन त्याचे अंगावर धावुन जावुन मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी सिमा ही भितीने दोन्ही मुले घेवुन माहेरी राहणेस आली. त्यानंतर दुस-या दिवशी बोराटवाडी गावातील लोकांनी मध्यस्थी करून सदरचा विषय मिटवला. त्यामुळे सिमा हिस नांदण्यासाठी आली.

त्यानंतर 27 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजताचे सुमारास शेतीच्या मोटारीच्या कारणावरून वाद काढुन तिला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी सिमा हिने सततच्या जाचाला व मारहाणीला कंटाळुन घरात असलेले तननाषक औषध पिले, त्यानंतर तिचेवर दवाखान्यात उपचार चालु असताना बुधवार (ता. 01) रोजी पहाटे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

यावरून महादेव रामचंद्र निकम, संपता महादेव निकम व गोविंद महादेव निकम (सर्व रा. बोराटवाडी, ता. इंदापुर) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेमुळे माहेरची लोक प्रचंड संतप्त झाले होते.अखेर सासरच्या दारातच महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT