दत्तात्रय भरणे sakal
पुणे

MPSC मध्ये यश मिळवून विद्यार्थ्यांनी इंदापूरचे नाव लौकिक केले : दत्तात्रय भरणे

दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थांचे सत्कार करण्यात आले.

राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील युवक व युवतींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षमध्ये घवघवीत यश मिळविले असून यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौैकिक राज्यामध्ये वाढला असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे काढले.

लासुर्णे (ता.इंदापूर) येथे रविवार (ता. २७) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या अकोले येथील अर्चना ज्ञानदेव दराडे ( साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), निमसाखर येथील संदेश जयंतराव मोरे (साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) व निमगाव केतकी येथील सुप्रिया विठ्ठल राजगुरू (पोलिस उपनिरीक्षक) यांचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ,छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर,जाचकवस्तीचे उपसरपंच प्रकाश नेवसे उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रखडलेली भरतीची प्रक्रिया महाविकास आघाडी सरकारने सुरु करुन राज्यातील युवक -युवतींना प्रश्‍न सोडविला. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील १० पेक्षा अधिक युवक व युवतींनी यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या इंदापूर तालुक्यातील युवक व युवतींचा अभिमान असून त्यांनी तालुक्याचे नाव राज्यामध्ये झळकवले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्त मदत करण्यात येणार असून यशस्वी युवक -युवतींनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT