पुणे

दुष्काळाचे सावट इंदापुरात गडद

CD

कळस, ता. ८ : इंदापूर तालुक्यात दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांत द्राक्ष हंगामाने शेतकऱ्यांच्या प्रपंचात गोडी आणली असली, तरी यंदाचा हंगाम दुष्काळामुळे धोक्यात येण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत.
परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. या पावसाने पाठ फिरवल्यास भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकरी चिंतातुर बनले आहेत. द्राक्ष बागांना हंगामाच्या शेवटच्या, म्हणजेच अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात पाणी कमी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३० टक्के पाऊस झाल्याचे बोलले जात आहे.

द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांवर तातडीने अनुदानाची फुंकर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत तीव्रतेने जाणवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

द्राक्ष बागांच्या आच्छादनासाठी एक एकर क्षेत्राच्या मर्यादेची अट रद्द करून ती एक हेक्टरपर्यंत करावी. सौर पंपासाठी पाच अश्वशक्तीपर्यंतची अट रद्द करून १० अश्वशक्तीपर्यंतचे सौर पंप बसविण्यास मान्यता द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाण्याच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार जास्तीच्या अश्वशक्तीचे सौर पंप बसविण्याची परवानगी व त्यासाठी सवलत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा आतापर्यंत अल्प पाऊस झाल्याने, द्राक्षाचे आगार समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. या अनुषंगाने आम्ही काही मागण्या शासनाकडे केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निर्माण झालेली पाण्याची टंचाई पाहता वैयक्तिक शेततळ्यांनाही मोठ्या प्रमाणावर अनुदान मंजूर करावे.
- गणेश सांगळे, मानद सचिव, द्राक्ष बागायतदार संघ

हंगाम जाचक ठरण्याची शक्यता
इंदापूर तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड आहे. दरवर्षी २०० कोटींहून अधिकची उलाढाल द्राक्ष हंगामात होत असते. गतवर्षी द्राक्षाचे उत्पादन घटले होते, परंतु बाजारात चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळाले होते. सलग दोन वर्षे झालेल्या चांगल्या आर्थिक फायद्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, यंदाचा हंगाम जाचक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT