पुणे

जमिनीच्या वाटणीवरून आईवडिलांना मारहाण

CD

इंदापूर, ता. १ : आईच्या नावावरील जमिनीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून दोन मुलांनी वडिलांना आणि आईला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना इंदापूरमध्ये घडली. याप्रकरणी संजय तुकाराम राऊत व राजेंद्र तुकाराम राऊत (दोघे रा. माळवाडी नं.२, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम किसन राऊत (वय ६५, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तुकाराम राऊत हे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे दोन्ही मुलगे संजय व राजेंद्र हे विभक्त राहतात. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम राऊत हे पत्नी अंजना यांच्यासोबत तरंगवाडी गावच्या हद्दीतील लॉन्सजवळील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी दोन्ही मुलांनी चारचाकी वाहनातून येत त्यांना अडवले. ‘‘तुम्ही आई अंजना हिच्या नावावरील जमीन का विकली,’’ असा जाब विचारत मुलांनी लाकडी दांडक्याने तुकाराम व अंजना राऊत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, तोंडावर, पायांवर व खांद्यावर गंभीर दुखापत झाली, तर अंजना राऊत यांच्या हाताला व कमरेला मार लागला. ‘‘विकलेली जमीन परत द्या, नाहीतर तुम्हाला आमचा हिसका दाखवतो,’’ अशी धमकी देऊन मुलांनी शिवीगाळ केली. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT