मत्स्यव्यवसाय
मत्स्यव्यवसाय sakal
पुणे

इंदापूर : मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी भरणे यांनी लक्ष घालणे गरजेचे

डॉ. संदेश शहा

इंदापूर : उजनी धरणातील मासेमारीवर कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून किमान ५ हजार कुटुंबे व्यवसायावर अवलंबून आहेत. उजनी धरणातील गोड्या पाण्यातील मासे मुंबई, कलकत्ता, हैद्राबाद, बंगलोर बाजार पेठेत विकले जात असून त्यांचा उजनी ब्रँड तयार झाला आहे. त्यामुळे या व्यवसायास चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.धरणात चिलापी मासे ८० टक्के तर कार्प जातीचे मासे २० टक्के सापडत आहेत.

त्यामुळे कार्प जातीच्या माश्यांचे संवर्धन करणे गरजेचे असूनत्यासाठी धरणात निरंतरपणे मत्स्यबीज सोडणे गरजेचे आहे.धरण व पाणलोट क्षेत्रात नदी काठी बंदी असलेल्या मांगुर या जातीचे उत्पादन काही लोक शासकीय नियम तोडून घेतात. त्याचा ठोस बंदोबस्त होणे गरजेचे आहे. राज्याचे मत्स्य राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा शेवटचा तालुका असून इंदापूरच्या शेवटच्या टोकावर पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर उजनी धरण आहे. धरणाच्या तालुक्यातील भिगवण ते तरटगाव या ३५ किलोमीटर पाणलोट क्षेत्रात सापडणारे मासे देशभर प्रसिद्ध आहेत.

वीस वर्षांपूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रात सर्वत्र चांभारी, वांब, मरळ, रोहू,कटला,शिंगाडा ,कानस,कोळीस,काब्रेल,खदरा,तांब-या व गुगळी हे मासे मुबलक प्रमाणात सापडत होते. मात्र सदर माश्यांचे मत्स्यबीज सोडणे ही प्रकिया शासन व ठेकेदार या कात्रीत अडकल्याने या माश्यांची टंचाई होऊन या व्यवसायास फटका बसला. यातील वांब हा सर्वात महाग मासा ओढे किंवा तालीलाच सापडतो तर चांभारी, कानस, कोळीस, काब्रेल,खदरा व तांब-या हे मासे नामशेष झाले आहेत. सन २००५ पासून चिलापी हा हा परदेशी मासा सापडू लागला. तो मूळ माश्यांना आपले खाद्य बनवत असल्याने व त्याचे नैसर्गिक प्रजोत्पादन होवून दर तीन महिन्यास अंडी देत असल्याने या माश्यांचे प्रमाण ऐंशी टक्के झाले आहे तर मरळ, रोहू, कटला आदि कार्प जातीच्या माश्यांचे बीज सोडावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

यासंदर्भात मत्स्य राज्य मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर,भिगवण ही तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील भिमानगर,टेंभूर्णी, कंदर,जेऊर, पांगरे,वाशिंबे, सुगाव, नागोबाचे शेटफळ ही महत्वाची मत्स्य विक्री केंद्र असून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उजनी ब्रँड माश्यांचे संवर्धन व प्रकिया उद्योग सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविला जाईल.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व प्रथम आम्ही मत्स्यबाजार सुरू करून मत्स्य व्यावसायिकांना न्याय दिला असून मत्स्य प्रकिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर मासळी बाजारात दररोज पाच ते सात टन तर भिगवण मासळी बाजारात दहा ते बारा टन माश्याची आवक होते. यावर हजारो लोकांची उपजीविका चालते. मध्यंतरी आम्ही मासे आडतदार व्यापाऱ्यांनी वर्गणी करुन मत्स्यबीज आणून पाणलोट क्षेत्रात सोडून हा व्यवसाय सुरू ठेवला.हा व्यवसाय शाश्वत रहाण्यासाठी शासनाने मत्स्यबीजवेळेत सोडुन ते पूर्ण वाढीनंतर विक्रीस सज्ज राहिल्यास या व्यवसायावर अवलंबून सर्व घटकांना अधिकचे चार पैसे मिळतील अशी प्रतिक्रिया अडत व्यापारी दत्तात्रय व्यवहारे व विजय नगरे यांनी दिली.

माश्यांची पिल्ले विषारी औषधाने मारून ती वाळवून परराज्यात बोटूकली विक्री करण्याचा प्रयत्न काही परप्रांतीय मच्छ व्यावसायिक करतात. हा अवैध व्यवसाय होत असून त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष होत आहे.त्यावर कारवाई होणेगरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT