पुणे

इंदापुरात ४०६१ घरकुले करणार रद्द

CD

पळसदेव, ता. २५ : घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेऊनही काम सुरू न करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील ४०६१ लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करण्यात येणार आहे. संबंधितांकडून हप्त्याची रक्कम वसूल करून त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्याचा इशारा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला आहे.
तालुक्यात २०१६-१७ पासून पंतप्रधान आवास, रमाई, मोदी आवास यांसह विविध योजनांतून बेघरांना १ लाख २० हजारांचा निधी दिला जातो. मात्र, ४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी १५ हजारांचा पहिला हप्ता घेऊनही अद्याप २६९ चौरस फुटांच्या घराचे बांधकाम सुरू केलेले नाही. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.
या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. मुदतीत काम सुरू न केल्यास घरकुल मंजुरी रद्द करून दिलेली रक्कम वसूल केली जाईल. पैसे परत न केल्यास लाभार्थ्यांच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेवर सरकारी बोजा नोंदविण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे खुडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT